Sunday, May 26, 2024
Homeनाशिकमधुबन कॉलनीत गादीच्या कारखान्यास आग; आतोनात नुकसान

मधुबन कॉलनीत गादीच्या कारखान्यास आग; आतोनात नुकसान

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील पंचवटी परिसरातील मधुबन कॉलनीत (Madhuban Colony Makhamalabad Road) आज सकाळी गादीच्या कारखान्याला (Fire) अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. मुख्य रस्त्यावरच हा कारखाना असल्यामुळे आगीचे लोळ बाहेर येऊ लागल्याने भीती निर्माण झाली होती…

- Advertisement -

घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आल्यानंतर अवघ्या तीन-पाच मिनिटातच अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. (Fire due to Short circuit)

या आगीत गादी कारखाना पूर्णपणे जळून खाक झाल्याने अतोनात नुकसान झाले. तर वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे कारखान्याशेजारीच असलेला गोठयाला हानी पोहोचली नाही तसेच इतर जीवितहानीदेखील यामुळे झाली नाही.

या घटनेत दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन विभागाचे अशोक सरोदे, मंगेश पिंपळे, नितीन म्हस्के, मनोज गायकवाड, धीरोदत्त पाटील यांनी तत्परता दाखवत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या