Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Fire News : म्हसरूळ परिसरात दोन ठिकाणी आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी...

Nashik Fire News : म्हसरूळ परिसरात दोन ठिकाणी आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

म्हसरूळ आणि पोकार कॉलनी परिसरात (Mhasrul and Pokar Colony Area) दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग (Fire) लागल्याच्या घटना घडल्या. सकाळी पोकार कॉलनीत रोहित्राने अचानक पेट घेतला,तर दुपारी म्हसरूळ गणेश नगर भागातील बांधकाम साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली. सुदैवाने,या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान (Damage) झाले आहे.

- Advertisement -

पोकार कॉलनीत रोहित्राने घेतला पेट

गुरुवारी सकाळी पोकार कॉलनीतील एका रोहित्राने अचानक पेट घेतला. स्थानिकांनी तातडीने अग्नीशमन विभाग (Fire Department) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीला माहिती दिली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रोहित्र विझवण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन दलाच्या त्वरित हस्तक्षेपामुळे काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली गेली आणि मोठा अनर्थ टळला.

म्हसरूळमध्ये गोदामाला आग, चारपेक्षा अधिक बंब घटनास्थळी

म्हसरूळ येथील दिंडोरी रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत बांधकाम साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. स्थानिक रहिवासी कचरा जाळण्याचा सर्रास प्रकार करत असल्याने, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास कुणीतरी कचरा जाळला.कचऱ्यातून उठलेल्या आगीने हळूहळू संपूर्ण गोदामाला विळखा घातला. आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तातडीने अग्नीशमन विभागाला कळवले.यावेळी तत्काळ मुख्य केंद्र तसेच पंचवटीतील क. का. वाघ महाविद्यालयाजवळील केंद्रावरून सुमारे आठ अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. स्लॅब टाकण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी पट्ट्या,लाकडी खांब, सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणि इतर साहित्याने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल एक तास झगडावे लागले.धुराचे प्रचंड लोट दूरपर्यंत पसरल्याने परिसरातील अनेक घरे काळवंडली.

शहरात वारंवार लागणाऱ्या आगी चिंतेचा विषय

म्हसरूळ आणि पोकार कॉलनीतील या घटनांमुळे शहरात वारंवार लागणाऱ्या आगींचा विषय ऐरणीवर आला आहे. बांधकाम साहित्य साठवलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने आगीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. तसेच, विद्युत रोहित्रांच्या देखभालीकडेही अधिक लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासनाने या घटनांमधून बोध घेऊन तत्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...