नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाला (Department of Health) मानधन तत्वावर आणखी ६४ डॉक्टर मिळाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. त्यामुळे मनपाच्या डॉक्टरांची संख्या २१६ वर पोहोचली आहे. दरम्यान, मनपाच्या शहरातील ६ प्रसूतिगृहांमध्ये नागरिकांचे येण्याचे प्रमाण वाढले असून दर महिन्याला ५०० प्रसूति होत आहे. गत वर्षात तब्बल ५,९३७ प्रसूति झाल्याची माहिती मिळाली आहे.
दिवसेंदिवस नाशिक शहराचा (Nashik City) विस्तार होत आहे. तसेच लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सुविधांमध्ये विशेष करुन आरोग्य सुविधा पुरविण्यात मनपाच्या सेवकांना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान महापालिकेच्या वतीने उत्तम आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मानधनावरील भरतीत महापालिकेच्या आरोग्य विभागाला तब्बल ६६ डॉक्टर मिळाले आहे. त्यात २० बीयुएमएस तर १० एमबीबीएस यांचा देखील समावेश आहे.
तर यापूर्वी आरोग्यवर्धिनींसाठी आरोग्य सेवक तसेच वैद्यकीय तज्ञ मिळाले होते. आपला दवाखान्यासाठी देखील वेगळे डॉक्टर मिळाल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे.मनपाच्या शहरातील सहा प्रसुती केंद्रांमधून दर महिन्याला सुमारे ५०० प्रसूती होत आहे. महापालिकेचे रुग्णालयांमधून (Hospitals) चांगले सेवा मिळत असल्यामुळे प्रसूतीसाठी देखील नागरिक महापालिकेच्या रुग्णालयांना पसंती देत आहे.
मागील वर्षभरात तब्बल ५,९३७ प्रसूती महापालिकेत रुग्णालयांमध्ये झाले आहे. त्यात तब्बल ४,८२३ नॉर्मल डिलिव्हरी झाले आहे तर ११४ यांना सिजर झाल्या आहे. शहरात महापालिकेच्या वतीने जिजामाता हॉस्पिटल, मायको हॉस्पिटल सातपूर, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय जुने नाशिक, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, इंदिरा गांधी हॉस्पिटल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल नाशिक रोड या ठिकाणी प्रसूतीची (Delivery) सोय करण्यात आलेली आहे.
झाकीर हुसेन रुग्णालयाची दुरुस्ती
नाशिक पूर्व विभागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त्त स्मिता झगडे यांनी नुकतीच भेट देऊ पाहणी केली. यावेळी बांधकाम विभाचे अभियंता देखील उपस्थित होत. रुग्णालयाची इमारत जुनी झाल्याने छतावर पाणी साचतो व त्यामुळे वरच्या मजल्यावरी रुग्णांना त्रास होत असल्याने छत्तावर नव्याने डोम तयार करून इतर बारीक सारीक कामे करण्याचे आदेश झगडे यांनी दिले.