Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून लाखोंचा विदेशी मद्यसाठा...

Nashik Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त

येवला |प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागीय भरारी पथकाने कोपरगाव-येवला रोडवर पिंपळगाव जलाल शिवारात वाहनतपासणी सापळा रचुन अवैद्यरित्या वाहतुक होत असलेला मध्य प्रदेशातील विदेशी मद्यसाठा कंटेनरसह जप्त केला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. श्री. विजय सुर्यवंशी, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त उषा वर्मा यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक किरण धिंदळे, दुय्यम निरीक्षक पी. आर. मंडलिक, सहायक दुय्यम निरीक्षक डी. बी. कोळपे, किरण गांगुर्डे, जवान धनराज पवार, महेश सातपुते, युवराज रतवेकर, राहुल पवार, विलास कुवर, महिला जवान सुनिता महाजन, मुकेश निंबेकर आदींच्या पथकाने केली.

- Advertisement -

सदर कारवाईत संशयित आरोपी शंभुसिंह भेरुसिंह राजपुत (वाहन चालक), वय-३३ वर्ष, राहणार मु.बस्सी पो. सिधावत, ता.सलंबर, जि. उदयपुर, राज्य. राजस्थान याला ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील मध्य प्रदेश राज्यात निर्मित विदेशी मद्य ११४१ बॉक्स, तपकीरी रंगाचे आयसर प्रो २११४ एक्सपी कंपनी निर्मित सहा चाकी ट्रक ( क्र. एमएच-२० इएल-६७९१), एक मोबाईल संच असा एकूण १ कोटी ०७ लाख ७२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पकडण्यात आलेल्या वाहनचा मालक व संशयीत अज्ञात इसम फरार झाला आहे. दरम्यान, सदर गुन्हयाचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक किरण धिंदळे हे करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...