Thursday, May 14, 2026
Homeक्राईमNashik News : वनविभागाची मोठी कारवाई; वन्यजीवांच्या अवयवासह भोंदू बाबाला अटक 

Nashik News : वनविभागाची मोठी कारवाई; वन्यजीवांच्या अवयवासह भोंदू बाबाला अटक 

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

इगतपुरी नगरपरिषद (Igatpuri Nagar Parisahd) हद्दीतील गिरणारे (Girnare) येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून वन्यजीवांच्या अवयवासह एका भोंदू बाबाला अटक (Arrested) करून मोठी कारवाई (Action) करण्यात आली असून संबंधित आरोपीवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी (Igatpuri) येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मौजे गिरणारे (ता. इगतपुरी) येथे धाड टाकून आरोपीच्या घरातून वन्य प्राण्यांचे विविध अवयव जप्त करत एका संशयितास ताब्यात घेतले. सदर प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी मा. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, इगतपुरी न्यायालयासमोर (Igatpuri Court) हजर करण्यात येणार आहे.

दि. ०८ मे २०२६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक इगतपुरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मौजे गिरणारे येथील एका व्यक्तीच्या घरात वन्यजीवांचे अवयव बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आले आहेत. सदर माहितीच्या आधारे वनविभागाच्या (Forest Depatment) पथकाने सायंकाळी पाच वाजता संबंधित ठिकाणी जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपी चंद्रकांत राजेंद्र माळी, वय ३३ वर्षे, रा. गिरणारे याच्या घरातून विविध वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले. यामध्ये सांबर शिंग, काळवीट शिंग, रानडुक्कर दात, घुबडाचे अवयव, साळींदर काटे तसेच मोरपिसांचा समावेश असून याची दोन लाख रुपये किंमत सांगण्यात येत आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ, वनपाल गावित, भोये, पवार, दिवाणे वनरक्षक पाटील, साबळे, धादवड, बागुल, गांगुर्डे, पोटिंदे, गावंडे मुजावर शेख आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर अवयव वेगवेगळ्या ठिकाणांहून आणल्याची माहिती दिली असून धार्मिक व दैविक कार्यात त्यांचा वापर होत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान गुप्त माहितीनुसार आरोपीकडे बंदूक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून संबंधित शस्त्राचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कारवाईनंतर आरोपीस ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पुढील चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून आरोपीस इगतपुरी न्यायालयात (Igatpuri Court) हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वन्यजीवांचे अवयव बाळगणे, व्यापार करणे अथवा त्यांचा अवैध वापर करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारची माहिती तात्काळ वन विभागास द्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ यांनी नागरिकांना (Citizen) केले आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

0
'नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा' ही म्हण नाशिकच्या महापालिकेला सध्यातरी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काही मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकची गणना होते. सुमारे साडेतीन हजार...