Monday, May 27, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात विविध अपघातात चौघांचा मृत्यू

नाशिक शहरात विविध अपघातात चौघांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

लाँकडाऊनमध्ये शिथीलता मिळताच शहरात वाहने सुसाट सुटली असुन वाहन अपघाताची मालिका सुरू झाली आहे. शहरात रविवारी (दि.१७) वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात चौघांचा मृत्यु झाला.

- Advertisement -

दिंडोरीरोडवर भरधव दुचाकी घसरल्याने चेतन राजेंद्र घुगे (४० रा.पिंपळगाव बहुला) या चालकाचा मृत्यु झाला. हा अपघात वर्मा यांच्या गोठ्या जवळ झाला होता. घुगे रविवारी (दि.१७) एमएच १५ जीएन ६०७९ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती.

भरधाव दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी घसरली होती. या घटनेत चालक घुगे दगडावर पडल्याने गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास उपनिरीक्षक मयुर पवार करीत आहेत.

नाशिक पुणे मार्गावर मारूती कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवर प्रवास करणार्‍या महिलेचा मृत्यु झाला. या घटनेत महिलेचा पती जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रसाद लक्ष्मण पागधरे व निता प्रसाद पागधरे हे दांम्पत्य रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास नाशिकरोड कडून सिन्नर फाट्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर (एमएच ०१ एवाय ३२५९) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.

राधा मोहन बिल्डींगसमोरील उड्डाणपुलावर पाठीमागून भरधाव आलेल्या मारूती कारने (एमएच १५ आर ४६३०) दुचाकीस धडक दिली. या अपघातात पागधरे दांम्पत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता निता पागधरे यांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी दर्शन पागधरे (रा.माहिम,मुंबई) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कंडारे करीत आहेत. पंचवटीतील निमाणी ते काट्या मारूती दरम्यान छोटा हत्ती टेम्पोच्या धडकेत कमलेश कपुरचंद यादव (४८ रा.तीन पुतळ््याजवळ,फुलेनगर) हा सायकलस्वार ठार झाला. यादव रविवारी (दि.१७) आपल्या सायकलवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने (एमएच १५ एफ व्ही १५७५) सायकलला धडक दिल्याने यादव गंभीर दुखापत झाली होती.

याप्रकरणी रविकुमार यादव यांच्या तक्रारीवरून टेम्पो चालक दिपक सरोदे (रा.वाल्मिकनगर) व टेम्पो मालक गिरीष ब्रम्हेचा (रा.दंडे हनुमान समोर) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन ढकलून सुरू करीत असतांना हा अपघात झाला होता. चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना त्याच्या ताब्यात वाहन दिल्याने मालकाविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. चौथी घटना अंबड लिंकरोड येथे झाला. या अपघातात देवेंद्र सुभाष जाधव (३५ रा.म्हाडा कॉलनी,चुंचाळे शिवार) हा दुचाकीस्वार ठार झाला. देवेंद्र जाधव गेल्या मंगळवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास अंबडलिंकरोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एचपी पेट्रोल पंप परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने देवेंद्र गंभीर जखमी झाला होता. त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता रविवारी (दि.१७) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला

- Advertisment -

ताज्या बातम्या