Friday, February 20, 2026
HomeनाशिकNashik News : सिएट कंपनी समोर गॅस पाईप लाईनची गळती अन् …;...

Nashik News : सिएट कंपनी समोर गॅस पाईप लाईनची गळती अन् …; उद्योगांचे नुकसान

नाशिक | Nashik

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीसमोर (CEAT Company) एमजीएनएलच्या गॅस पाईपलाईनमधून अचानक गॅस गळती झाल्याने परिसरातील उद्योजकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे २० ते २५ मिनिट गॅसचे फवारे उडत असल्याने नागरिकांमध्ये (Citizen) भीती पसरली होती. तासभराच्या प्रयत्नांनंतर एमजीएनएलच्या आपत्कालीन पथकाने आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन गळती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या कालावधीत काही उद्योगांचे उत्पादन ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मार्गावर खोदकाम सुरू असताना जेसीबीचा (JCB) धक्का लागून गॅस पाईपलाईनला भगदाड पडले. त्यानंतर या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात गॅसचे फवारे होऊ लागले. यावेळी पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागल्याने परिसरातील उद्योगांमध्ये खळबळ उडाली. सिएट कंपनी तसेच समोर असलेल्या बाबासाई बेकरी या दोन्ही ठिकाणी उत्पादन प्रक्रियेसाठी भट्ट्या सुरू असल्याने आगी पासूनचा धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने तातडीने सर्व यंत्रणा बंद करण्यात आल्या. विशेषतः बाबासाई बेकरीमध्ये भट्टी बंद करून उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली. भट्टीतील प्रक्रियेसाठी टाकलेला कच्चा माल तातडीने बाहेर काढावा लागल्याने आणि सुमारे दीड तास उत्पादन बंद राहिल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते.

YouTube video player

दरम्यान, सिएट कंपनीतही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याने उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झाल्याचे बोलले जाते. एमजीएनएलचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने तपासणी करून गळती बंद केली व परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर परिसरातील उद्योजकांचा जीव भांड्यात पडला. अल्पावधीत घडलेली ही गॅस गळतीची दुसरी घटना असल्याचे सांगितले जात असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गॅस पाईपलाईन सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एमजीएनएलने (MJNL) आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा जागृत कराव्यात, अशी मागणी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Bhiwandi Mayor Election : हिसाब बराबर! भाजप बंडखोर काँग्रेसच्या पाठिंब्यावर...

0
ठाणे | Thane भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक (Bhiwandi Mayor Election) आज (शुक्रवारी) पार पडली. यात महापौरपदी भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना सर्वाधिक ४८ मते...