Thursday, September 3, 2026
HomeनाशिकNashik News : मुलीला कुत्र्याचा चावा; गंभीर जखमी

Nashik News : मुलीला कुत्र्याचा चावा; गंभीर जखमी

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

- Advertisement -

टाकळी फाटा (Takli Phata) भागाता एका ३० वर्षी मुलीला आज शनिवारी दुपारी भटक्या कुत्र्याने चावा (Dog Bite) घेतल्याची घटना घडली. डाव्या हाताच्या अंगठा व मनगटावर जखम झाल्याने त्यांनी तत्काळ नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसैन दवाखान्यात दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहू अशोक पवार (वय ३०) असे त्या मुलीचे (Girl) नाव आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मालिका सुरू केली असून पहिला डोस दिला आहे. त्याचबरोबर टिटॅनस इंजेक्शन, ‌‘रॅबिप्युअर‌’ इंजेक्शन तसेच इम्युनोग्लोब्युलीन उपचारही देण्यात आले आहेत.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तातडीने मनपाने (NMC) उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांसह समाजसेवक जुबेर हाश्मी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ३ सप्टेंबर २०२६ – ‘आवाज’ विवेक, संस्कृती, आरोग्याचा!

0
संपूर्ण महाराष्ट्राला लाडया बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली होती, तो उद्देश समाजप्रबोधन, राष्ट्रीय जाणिवा...