नाशिक | प्रतिनिधी | Nashik
यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील प्रमुख ३१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तब्बल कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे (Gold and Silver) अलंकार आणि मौल्यवान वस्तू असणार आहेत. या मौल्यवान उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने (Police Administration) सुरक्षेचे नियोजन केले असून, या विशेष मंडळांवर पोलीस आणि गुन्हे शाखेची नजर राहणार आहे.
पाेलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या पाहणीत शहरातील या ३१ प्रमुख मंडळांची नोंद अतिमहत्त्वाची आणि मौल्यवान म्हणून करण्यात आली आहे. बाप्पाच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि मंडपातील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बंदोबस्त आखण्यात आला आहे. मौल्यवान दागिने असणाऱ्या ३१ मंडळांच्या परिसरात गुन्हे शाखेची विशेष पथके, साध्या वेशातील पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची २४ तास नजर असेल.
शहरभरातील ७०० हून अधिक मंडळांना ऑनलाईन ‘एक खिडकी’ योजनेद्वारे अटी व शर्तींवर परवानग्या वाटप करण्यात आल्या आहेत. त्यात, परिमंडळ दाेनमध्ये उपायुक्त किशाेर काळे यांच्या आदेशाने २५६ मंडळांना अटी शर्तींसह परवानगी बहास करण्यात आली आहे. खोदलेले रस्ते व ध्वनिमर्यादेच्या एनओसीसाठी मंडळांची धावपळ सुरू असून, सोमवार (दि. १४) दुपारपर्यंत परवानगीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
पाेलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monika Raut) (परिमंडळ १) व उपायुक्त किशोर काळे (परिमंडळ २) यांच्याकडून अंतिम मंजुरी दिली जात असून, उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या नेतृत्वात वाहतूक नियोजन तयार करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनापासून ते देखावे आणि विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुढील चार दिवसांत संपूर्ण शहर व जिल्ह्याचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
मौल्यवान मंडळे
मंडळे प्रकार
सरदार चौक – ३५ किलो चांदीचे दागिने
एस.एफ.सी फाऊंडेशन, हिरावाडी – ६ किलो चांदीची गणेश मूर्ती
नवजीवन सांस्कृतिक, पंचवटी – ७०० ग्रॅम चांदीची गणेश मूर्ती
नवनिर्माण कला व क्रिडा, हेमकुंज – ११ किलो चांदीची गणेश मूर्ती
सूर्यप्रकाश नवप्रकाश, घनकर लेन – ११ किलो चांदीची गणेश मूर्ती
तिळभांडेश्वर लेन – ११ किलो चांदीची मूर्ती व १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने
पगडबंद लेन – ५१ किलो चांदीची गणेश मूर्ती व ११ ग्रॅम सोन्याचे दागिने
अशोकस्तंभ – २१ किलो चांदीची गणेश मूर्ती
मानाचा राजा – २ पाय, एक हात, दोन दात, एक बाळी, एक मूषक, हार व ७ किलो चांदी
रविवार कारंजा गणेश – १५१ किलो चांदीची मूर्ती व १.२५ ग्रॅम चांदीचे दागिने
साक्षी गणेश, भद्रकाली – सोन्याचे हार व चांदीचे दागिने
शिवसेना युवक मित्र, मेनरोड – सोन्याचे हार व चांदीचे दागिने
जाणता राजा, डिंगरआळी – चांदीचे दागिने
युवक उन्नती, भद्रकाली फ्रूटमार्केट – सोन्याचे दागिने
उत्कृष्ठ, नाईकवाडीपुरा – चांदीचे दागिने व चांदीचा टोप
रोकडोबा – सोन्याचे दागिने
नवक्रांती, काठेगल्ली – ३४ किलो चांदीची गणेश मूर्ती व ४८ किलो सिंहासन
रजत नवश्या बहुउद्देशीय संस्था, अशोकनगर – २५ किलो चांदीची गणेश मूर्ती
बजरंग, अंबड-लिंक रोड – २.५ किलो चांदीची गणेश मूर्ती
एकता विविद्य विकास सेवा, राजरत्ननगर – ५ किलो चांदीची गणेश मूर्ती
श्रीकृष्ण कला क्रिडा व सांस्कृतिक, अंबड – ११ किलो चांदीची मूर्ती, २ किलो उंदीर, २ किलो सिंहासन
अभिनव, तेलीगल्ली, भगूर – ६.५ किलो चांदीची गणेश मूर्ती
भगूर हनुमान मंदिर – १.१४० ग्रॅम चांदीची गणेश मूर्ती
वंदे मातरम् संघटना, भगूर – ८.२५ तोळे सोन्याची गणेश मूर्ती
तरूण उत्सव, भगूर – ७ किलो चांदीचे अलंकार
इच्छापूर्ती गणेश मंदिर, देवळाली कॅम्प – २ किलो चांदीची गणेश मूर्ती
बालाजी फाऊंडेशन, नाशिकरोड – ३० किलो चांदीची गणेश मूर्ती व ५ ग्रॅम सोने
इच्छापूर्ती गणेश, गांधीनगर – ५.५ किलो चांदीची गणेश मूर्ती
इगल स्पोर्ट अँड सोशल क्लब, नाशिकरोड – २६ किलो चांदीची गणेश मूर्ती
सौभाग्यनगर, लॅमरोड – ५.३६ ग्रॅम चांदीची गणेश मूर्ती व १ ग्रॅम सोन्याचे अलंकार
विजय अमरदीप, देवळाली कॅम्प – ११ किलो चांदीची गणेश मूर्ती




