Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे मोठे...

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून त्याची वसुली कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामान्य नाशिककरांना वेगळे न्याय व शासकीय कार्यालयांना वेगळे न्याय कसे. कारण नाशिक मनपाचे प्रॉपर्टी टॅक्स अर्थात घरपट्टी थकबाकीचा डोंगर झाला आहे. सुमारे ५६४ कोटी रुपये मनपाचे अडकले असून मनपाकडून टॉप थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र विभागीय महसूल आयुक्तालयासह बीएसएनएल, विविध मोबाईल टॉवर कंपन्या व विशेष करुन करंसी नोट प्रेसवर कोटींची घरपट्टी थकीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसुलीसाठी वारंवार नोटिसा बजावूनही या कार्यालयांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

- Advertisement -

एकीकडे थकबाकी वसुलीसाठी शासकीय कार्यालयांना विनंतीपत्र रवाना केले जात आहे, मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांच्या मिळकतींवर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे हा दुजाभाव असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून महापालिकेकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी विशेष पथक तयार करुन पाठविण्यात आले आहे. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

महापालिकेवर थकबाकीचा ५६४ कोटींचा डोंगर आहे. महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात एतिहासिक अडीचशे कोटीची रेकॉर्डब्रेक मालमत्ता कराची वसुली केली. एकीकडे कर विभागाने ही कामगिरी केली असताना दुसरीकडे मात्र थकबाकीचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसून आतापर्यतची थकबाकी ५६४ कोटीच्या घरात गेली. थकबाकी भरावी याकरिता महापालिका प्रशासनाने एप्रिलमध्ये ते जून या तीन महिन्यात करसवलत या हजार ५४९ रुपयांचा भरणा नागरिकांनी केला आहे. थकबाकीचा महाकाय डोंगर पार करण्याचे आव्हान मनपासमोर आहे.

प्रेसवर ३५ कोटी 
नाशिकरोड येथील नोट प्रेसवर मनपाची सुमारे ३५ कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. त्याच प्रमाणे विविध मोबाईल टॉवर कंपन्यांवर सुमारे ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर देखील सुमारे साडेचार लाख रुपये थकबाकी आहे.

ज्या शासकीय कार्यालयांवर मनपाचे कर थकीत आहे, त्यांना पत्र देण्यात येत असून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.
अजित निकत, उपायुक्त कर, मनपा

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहुल

Rahul Gandhi: “जर भविष्यात पुन्हा असे वक्तव्य केले तर, कोर्ट स्वत:हून…”;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आज सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देताना कान टोचले. लखनऊ कोर्टाने...