Thursday, February 5, 2026
HomeराजकीयNashik News : नाशिकमध्ये राजकीय नेत्यांची मांदियाळी; राज्यपाल, फडणवीस, शिंदे, पवार, राऊतांची...

Nashik News : नाशिकमध्ये राजकीय नेत्यांची मांदियाळी; राज्यपाल, फडणवीस, शिंदे, पवार, राऊतांची हजेरी

कारण काय?

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये दोन दिवसांपासून नेत्यांची मोठी मांदियाळी बघायला मिळत आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात साधू-महंत यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा केली. त्यानंतर विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती.

- Advertisement -

यानंतर आज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असून, ते कालपासून नाशकात मुक्कामी आहेत. तसेच राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे नाशकात नेत्यांची रेलचेल पाहायला मिळत आहेत.

YouTube video player

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या नव्या रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ते एका लग्न सोहळ्याला हजेरी लावणार असून, दुपारी १.१५ वाजता ओझर विमानतळावरून मुंबईला (Mumbai) रवाना होणार आहेत. तसेच राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे देखील आज सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले असून, ते एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे समजते.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येणार असून, ते ठाकरे गटाचे नेते विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यानंतर नाशिकवरून ४ वाजेच्या सुमारास मुंबईला रवाना होणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील नाशिक दौऱ्यावर येणार असून, ते देखील एका विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील आज नाशिक दौऱ्यावर असून, ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे समजते. यानंतर पक्षाचे पदाधिकारी विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या मुलीच्या लग्नाला राऊत उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...