Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस; द्राक्ष उत्पादक चिंतित

Nashik News : निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस; द्राक्ष उत्पादक चिंतित

निफाड | प्रतिनिधी | Niphad

गत काही वर्षापासून द्राक्ष हंगामात मोसमी पाऊस पस्तूनही अवकाळी पाऊस म्हणा की गारपिटाने द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक द्राक्ष छाटणीपासून ते माल काढणीपर्यंत अवकाळी व गारपिटीच्या धास्तीने धास्तावलेला असतो. द्राक्षबाग उभी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झालेला असतो. हवामान खात्याच्या माहितीनुसार २७, २८, २९ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीटीची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने द्राक्ष उत्पाद‌कांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

शुक्रवार (दि.२७) डिसेंबर रात्री निफाड शहरासह (City of Niphad) पिंपळगाव, लासलगाव च द्राक्ष पट्टयात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. नशिबाने म्हणा की सुदैवाने पावसाने सुरुवात केली होती परंतु यात गारपीट झाली नसल्याने जीवावरचे बोटावर निभावले, अशीच प्रतिक्रिया काही द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली. तर अजूनही आज व उद्याची टांगती तलवार शेतकऱ्यांवर (Farmers) असल्याने निसर्ग राजा आता द्राक्ष उत्पादकांना नवीन वर्षाची काय भेट देतो, हे आता दोन-तीन दिवसात निसर्गाची कृपा होते की अवकृपा हे कळणार आहे.

दरम्यान, ढगाळ हवामानामुळे (Cloudy weather) कृषी विक्रेत्यांना सोन्याचे दिवस आले. कांदा, द्राक्ष यावर बुरशीनाशके, कीटकनाशके फवारणीसाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. ओझर, पिंपळगाव, लासलगाव, निफाड, कसबे सुकेणे, सायखेडा, चांदोरी आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी दुकानात गर्दी केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. द्राक्षबागांमध्ये मशागत व शेकोटी पेटवली जात आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका द्राक्ष उत्पाद‌कांना गत दहा वर्षापासून बसत आहे. हवामान खात्याच्या दोन-चार दिवसापासून दिलेल्या अंदाजानुसार काल काही ठिकाणी मध्यम व किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाल्याने त्यात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे. फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षांना व साखर उतरलेल्या द्राक्षबागाला यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. पहाटे दव पडून पाण्याचे बाष्पीभवन होऊन द्राक्षबागांना तडे जाण्याची शक्यता आहे.

विलासराव भोसले, द्राक्ष उत्पादक, सारोळे खुर्द

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...