Wednesday, February 19, 2025
HomeनाशिकNashik News : द्राक्ष बाजारपेठेत दाखल; परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खरेदी

Nashik News : द्राक्ष बाजारपेठेत दाखल; परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खरेदी

नाशिक | Nashik

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) द्राक्ष बाजारपेठेत (Grapes Market) दाखल झाल्याने ग्राहकांचे लक्ष वेधू लागले आहेत. तसेच परप्रांतीय व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणावर द्राक्ष खरेदीला पसंती देत असल्याने द्राक्ष उत्पादकांना माल विक्रीचे आणि चांगला दर मिळत असल्याचे वातावरण आहे.

- Advertisement -

द्राक्षांची खुडणी सुरू झाल्यामुळे दिंडोरी-वणी, वणी- सापुतारा, वणी कळवण रस्त्यावर द्राक्ष विक्रीची दुकाने थाटली आहेत. रस्त्याने जाणाऱ्या-वेणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष विविध रंगाच्या द्राक्षांकडे वळत आहे. त्यामुळे ते खाण्याचा मोह होत असल्याने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.सध्या विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर अथवा छोटी दुकाने द्राक्ष विक्रीसाठी सज्ज झाली आहेत. सध्या द्राक्ष ८० ते ९० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहेत.

यंदा पावसाचे (Rain) प्रमाण काही भागात योग्य होते तर काही भागात नुकसानीचे ठरले होते. परंतु सध्या द्राक्ष हंगाम जर पाहिला तर योग्य मार्गाने वाटचाल करत आहे. द्राक्षांना प्रतिकूल वातावरणातून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) महागडे कीटकनाशके फवारणी करून विविध संकटातून आपल्या द्राक्षबागा वाचवल्या असल्याने व बागांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर झाल्याने आता फक्त येणाऱ्या काळात द्राक्षाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, अशी आशा तालुक्यातील बळीराजाला लागली आहे.

यंदाच्या द्राक्ष हंगामात मागील हंगामापेक्षा काही पटीने खर्च बाढला आहे. त्यात छाटणीपासून ते महागड्या औषध फवारणीपर्यंत अत्यंत काटेकोर खर्चाचे नियोजन करून द्राक्षबागा तयार केल्या आहेत. त्यासाठी यंदातरी योग्य भाव द्राक्ष पिकाला मिळावा, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे. सध्या दिंडोरीचे द्राक्ष खरेदी करण्यासाठी परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांचे दिंडोरी व परिसरात आगमन होत आहे. त्यात कोलकाता, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हैदराबाद, काशी, मुंबई, राजस्थान आदी भागातून द्राक्ष व्यापारी हे पिंपळगाव बसवंत, खेडगाव, वणी, जऊळके दिंडोरी, बडनेरभैख येथे येऊन आपल्या खरेदी केलेल्या द्राक्षाच्या गाड्या लोडिंग करत आहेत.

यंदा नवीन व्यापारीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर आगमन होताना दिसत आहे. परंतु अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी हे आपल्या कायमच्या व ओळखीच्या व्यापारीवर्गालाच आपला द्राक्षमाल दरवर्षी विकत असतात. त्यामुळे जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य व नवीन व्यापाऱ्यांकडे (Traders) कानाडोळा हे समीकरण बरीच शेतकरीवर्ग करतात.दिंडोरीमध्ये मागील काही वर्षे अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला नवीन व्यापारीवर्गाने जादा भावाचे आमिष दाखवून माल खरेदी करून लाखो रुपयांना गंडा घातला होता. अशा व्यापारी वर्गावर यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची करडी नजर राहणार की नाही, असेही बोलले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या