नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ह्युमन मे टाप्न्युमो व्हायरसचे (एचपीएमव्ही) रुग्ण (Patient) देशभरात सापडले असून, हा व्हायरस महाराष्ट्र, गुजरातपर्यंत देखील येऊन पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) याची लागण होऊ नये, यासाठी जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दीपक लोणे यांनी तत्काळ सर्व तालुका आरोग्याधिकाऱ्यांची बैठक घेतली.
शासनाकडून (Government) देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. तसेच सर्व अधिका-यांना योग्य त्या दक्षतेसह तपासणी यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.एचपीएमव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूळमध्ये आढळल्यानंतर हा विषाणू गुजरात, महाराष्ट्रात येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणादेखील खडचडून जागी झाली आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वेदेखील जारी केली आहेत.
त्याच धर्तीवर राज्य आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला (Health System) देखील दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यासह सर्व प्रकारच्या दक्षतेचे निर्देश देण्यात आले. सणांना काही त्रास झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
बैठकीतील सूचना
संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावले उचलत त्याला क्वारंटाइन करावे.
खबरदारी म्हणून यंत्रणा सज्ज ठेवावी.
ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा संशयित रुग्ण आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावे.
व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा करावा ऑक्सिजन, ब्रॉन्कोडायलेटर्स, अॅटिहिस्टामाईन, पॅरासिटेमॉल आणि कफ सिरप ही औषधे रुग्णालयात ठेवावी.
सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांची नियमित तपासणी केली जात आहे. यात श्वसनाचा त्रास होत असेल किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना आयसोलेशमध्ये ठेवले जात आहे. याबाबतचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. राजेंद्र बागूल, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी, जि. प