नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गावाजवळील जेएमसीटी सिटी कॉलेजसमोरील (JMCT College) काद्री एम्पायर इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी (दि. १६) दुपारी घडली. बुशरा अंजूम शेख असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप प समजू शकलेले नाही. मुंबई नाका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी बुशराने अचानक घरातून खुर्ची आणली, बाल्कनीची खिडकी उघडून थेट खाली स्वतःला झोकून दिले. घरात उपस्थित असलेल्या तिच्या वडिलांनी (Father) तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिची ओढणीच त्यांच्या हाती आली आणि ती थेट नवव्या मजल्यावरून खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू (Death) झाला.
दरम्यान, मृत बुशराच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहीण, एक मोठी बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. एका उच्चशिक्षित तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण पोलीस (Police) शोधत आहेत.




