नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र शासनाने मंगळवार (दि. २ डिसेंबर २०२५) रोजी होणाऱ्या नगरपंचायत व नगरपालिका (Nagarpanchyat and Nagarparishad Election) निवडणुकांसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. संबंधित नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रात नोंदणीकृत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व खाजगी आस्थापना, कंपन्या, उद्योग, कारखाने व कार्यालयांनी आपल्या कामगारांना मतदानासाठी (Voting) पगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे. मतदानासाठी कोणत्याही कामगाराला कामावर उपस्थित राहण्याची सक्ती करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.
तसेच कामगारांनी निर्भयपणे व मुक्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन कामगार उपयुक्त विकास माळी यांनी केले असून, सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. लोकशाही (Democracy) सुदृढ करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार उपयुक्त विकास माळी यांनी केले आहे.




