Sunday, July 26, 2026
HomeनाशिकTrimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला गर्दीचा महापूर; बेशिस्त वाहन ...

Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला गर्दीचा महापूर; बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांना त्रास

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

आज (सोमवार) तिसरा श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) भाविकांची (Devotees) गर्दी ओसंडून वाहत आहे. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवस सुमारे १ ते दीड लाख भाविक ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरला दाखल झाले आहेत. त्यामुळे त्र्यंबकला गर्दीचा महापूर बघायला मिळत आहे. ‘बम बम भोले आणि हर हर महादेव’च्या घोषणांनी ब्रम्हगिरीचा परिसर दुमदुमून गेला आहे.

- Advertisement -

तर जागोजागी गर्दी झाल्याने दुचाकी चालकांना वाहने चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे. काल (रविवारी) दुपारपासूनच भाविकांची त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. खाजगी वाहनांना देखील त्र्यंबकमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे नाशिकहून जाणारी वाहने तळेगाव फाटा येथे तर जव्हारकडून येणारी वाहने अंबोली फाटा येथे पार्किंग करून भाविक एसटी महामंडळाच्या बसने (ST Bus) त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण करत आहेत.

दरम्यान, काल रात्रीच भाविकांनी कुशावर्त कुंडावर (Kushavart Kund) स्नान करून ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी मार्गक्रमण करण्यात सुरुवात केली होती. त्यानंतर आज सकाळपासून राज्यातील विविध जिल्ह्यांतील भाविकांसह नाशिक जिल्ह्यातील भाविक देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होऊन ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाल्याचे बघायला मिळत आहे.

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी अन् नागरिकांना त्रास

प्रशासनाकडून खाजगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असली तरी दुसरीकडे ग्रामीण भागातील वाहनधारकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे. ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचा प्रमुख मार्ग असलेल्या गणपतबारी परिसरात ग्रामीण भागातील वाहनचालकांनी थेट रस्त्यावर वाहने पार्किंग केली आहेत. त्यामुळे पिंपळद, ब्राम्हणवाडे, माळेगाव या गावांकडे जाणाऱ्या लोकांची अडचण झाली आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय भाविकांसाठी जागोजागी प्रसाधनगृह आणि फेरीमार्गावर वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0
दिल्ली । Delhi केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी, २५ जुलै रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे....