ओझे | विलास ढाकणे | Oze
शहरी भागात फास्ट लॉजिंगच्या (Lodging) फोफावलेल्या व्यवसायाचे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे. कमी वेळेत अव्वाच्या-सव्वा मिळणाऱ्या पैशाच्या लोभापायी नैतिकता गहाण ठेवून व सामाजिक जबाबदारी पुसटशी जाणीव नसलेल्या असंवेदनशील घटकांनी अल्पवयीन यांना कुकर्म करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतुने फास्ट लॉजिंगची सोय उपलब्ध करुन दिल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे. त्यामुळे “आंबा” चांगलाच प्रकाशझोतात आला असून, खाकीशी असलेल्या मधुर संबंधांमुळे महागड्या वस्तुंची देवघेव ,वाढदिवसाला पार्ट्या व मासिक लक्ष्मी दर्शन याच्या संरक्षणाखाली मांडला गेलेला अनैतिक बाजाराला आशीर्वाद कुणाचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
दिंडोरी शहरालगत (Dindori City) काही अंतरावर व शहरात असलेल्या फास्ट लॉजिंगला सुगीचे दिवस आले आहेत. महाविद्यालयीन बरोबर अल्पवयीनही या ठिकाणी गोल्डन टाईम घालवण्यासाठी येत असल्याची वंदता आहे. यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असलेल्याचा वाढता उच्छाद यामुळे परीसराच्या नावलौकिकाला काळीमा लागल्याचा सुर उमटत आहे. नैतिकता, सामाजिक जबाबदारी,संस्कृती व समाज व्यवस्था याला सुरूंग लावण्याचा विडा संबधितांनी उचलला आहे. त्याला खाकीचे संरक्षण असावे हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. दिंडोरी पोलिस ठाण्याच्या (Dindori Police Station) कार्य क्षेत्रात गुटखा निर्मितीचा कारखाना सापडला, एम डी ड्रग्ज कनेक्शनचे लागेबांधे पुढे आले. एवढेच कमी की काय आता अनैतिकतेसाठी बेकायदेशीर फास्ट लॉजिंगला खुला परवाना दिला की काय? असा संतप्त सवाल जन माणसातून विचारला जात आहे.
इझी मनी व आरामदायी आयुष्यासाठी पैसा आवश्यक आहे. मात्र, तो कमावण्यासाठी नैतिकता पायदळी तुडविणाऱ्यांना जाब विचारणार कोण? कारण खाकीच्या दावणीला बांधलेली व सामाजिक जागृती करणारे निरूत्साही त्यात विरोध करणारा हेतू पुरस्कर त्रास त्यामुळे पुढाकार घेणार कोण? आणि कशासाठी? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणाऱ्याचे हात बांधले गेल्याने ‘दिन दोगुनी रात चौगुनी’ असे सुगीचे दिवस अनैतिक व बेकायदेशीर फास्ट लॉजिंग व्यवसाय करणार्यांचे आल्याने केवळ दिंडोरी शहर व परिसर नव्हे तर तालुक्यात अनेक ठिकाणी असे उद्योग सुरु असल्याची चर्चा आहे.विशेष बाब म्हणजे मटका, गुटखा, बेकायदा दारु विक्री, ऑनलाईन जुगार (Online Game) असे खाकीला लक्ष्मी दर्शन घडवून आणणाऱ्या अवैध व्यवसायाला आशीर्वाद कोणाचा असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान, भाजप नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी वणी शहरात अफु, गांजा, बेकायदा दारु विक्री व इतर खाकीचे महसूल वाढविणारे उद्योग सुरु असल्याची माहिती पत्रकार परीषदेत दिली होती. थोड्या फार प्रमाणात तालुक्यात असे उद्योग सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. सामाजिक जागृततेचा अभाव दिंडोरी शहरातील सर्वच लोक प्रतिनिधीचे दुर्लक्ष ,अशा व्यवसायाना राजाश्रय ,खाकीची असंवेदनशीलता व जनजागृतीबाबत असलेला उदासीन दृष्टीकोन आणि वास्तव म्हणजे अशा व्यवसायात खोर्याने मिळणारे लक्ष्मी दर्शन होय. माध्यमांनी अनेकदा ओरड करूनही काहीही कारवाई झालेली नाही. उलट भूमिका घेणारा कुठे अडकतो असे नियोजन आखून कार्यक्रम करणाऱ्यांना साथ देणारे झारीचे शुक्राचार्यही कमी नाहीत हे देखील तितकेच खरे आहे.





