Tuesday, August 18, 2026
HomeनाशिकAjit Pawar Death : अजित पवारांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

गोदावरीच्या पवित्र तीरावर पारंपरिक विधी, वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक वातावरणात अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी पुजारी यांनी विधी पौरोहित्य केले.

अस्थी विसर्जनाच्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात दुःखाची भावना स्पष्टपणे दिसून येत होती. अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जनतेसाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. रामकुंड परिसरात काही काळ शोकमय शांतता पसरली होती.

हे देखील वाचा : Nashik News : अजित पवारांचा अस्थिकलश आज जिल्ह्यात; नाशकात सर्व पक्षीय शोकसभा

अजित पवार यांचा अस्थिकलश मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) व माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे अस्थिकलश नाशिक येथे आणले. नाशिक (Nashik) येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर (Ramkund) अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : कॅबिनेट मिटिंगच्या निमित्ताने दिवसभर सोबत अन् २८ तारखेला अचानक…; अजितदादांच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगताना भुजबळ भावूक

दरम्यान, यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंत जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, आनंद सोनवणे, सीमंतिनी कोकाटे, ज्ञानेश्वर गायकवाड, विनायक माळेकर यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर; अभिनेते सयाजी शिंदेंसह ‘यांचा’ होणार सन्मान

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...