Sunday, October 4, 2026
HomeनाशिकIndependence Day : नाशिक महापालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Independence Day : नाशिक महापालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन (Independency Day) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात (Flag Hosting) आले. यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करून तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी परेडची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी म्हसरूळ येथे एमएनजीएलच्या कामादरम्यान लागलेली आग कोणतीही जीवितहानी न होता आटोक्यात आणणाऱ्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सायकलप्रेमींनी महापालिका परिसरातून (NMC Area) रॅली काढली.

या रॅलीला महापौरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. तसेच ‘हर घर सेल्फी’ उपक्रमांतर्गत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्तांनी तिरंग्यासोबत सेल्फी काढत नागरिकांनीही हा उपक्रम घराघरात राबविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, साताळकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, नगररचना अधिकारी सचिन जाधव, अग्निशमन दलप्रमुख संजय बैरागी यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...