Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News: सिंहस्थ विकासकामांसाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांचा गोदा घाटावर पाहणी दौरा

Nashik News: सिंहस्थ विकासकामांसाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांचा गोदा घाटावर पाहणी दौरा

नाशिक | प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचे नियोजन करून त्यांना गती देण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत जिल्हाधिकारी जलज शर्मा व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पायी फिरून गोदावरी काठावरचा सविस्तर आढावा घेतला व विविध विकास कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

नाशिकमध्ये कुंभमेळा २०२७साठी महत्त्वपूर्ण स्थळांची पाहणी, व्यापक विकास आणि नियोजनास गती आगामी कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त समन्वयाने पंचवटी विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कुंभमेळ्यासंदर्भातील आवश्यक बाबींचा आढावा घेतला. कुंभमेळा २०२७ साठी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी तत्काळ नियोजन व कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश
साधूग्राम ते रामकुंड अमृत मिरवणूक मार्ग व परतीचा मार्ग, काँक्रीट रस्त्यांचे नूतनीकरण व रुंदीकरण, रस्त्यालगत पौराणिक व रामायणकालीन मित्तीचित्रे रंगवून सुशोभीकरण, अतिक्रमण व
अनधिकृत बांधकामे हटविणे.
नदीघाट भाजी मार्केट पुनर्विकास व स्थलांतर.
गाडगे महाराज पुलालगत मिरवणुकीसाठी डाऊन रॅम्प बांधणी.
वाघाडी नदी सुशोभीकरण व प्रवाह नियोजन.
नदीतील सांडपाणी प्रवाह अडविणे व वळविणे, वाघाडी नदीच्या काठावर व्यू कटर मिंत आणि पर्यावरणपूरक सुशोभीकरण .
नदीकाठचा भाविक शाही मार्ग आणि पादचारी पूल.
टाळकुटेश्वर पुलाजवळ सांड्या पूल बांधणी, रामकाल पथ अंतर्गत संपादन करावयाच्या ठिकाणांची पाहणी.
वाहतूक आणि पूल सुधारणा.
मिकूसा पेपर मिल येथील नवीन पूल सुरू करण्यासाठी खांब स्थलांतर, कॉलेज ते हिरावाडी रोड पुलासाठी मिसिंग लिंक संपादन.
वाहतूक व पार्किंग नियोजन. अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी ई-रिक्षा व मोटारसायकल सेवा, पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे वाहनतळ विकसित करणे.
आपती व्यवस्थापन व सुरक्षा उपाययोजना. संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, गर्दी नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा व सुरक्षा उपाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...