सिन्नर | Sinnar
येथील श्रीगोंदेश्वर महादेव मंदिरात (Gondeshwar Mahadev Temple) किरणोत्सव सुरू झालेला आहे. सूर्योदयाचे (Sunrise) सूर्यकिरणे पहाटेच्या वेळी नंदी मंडपातून थेट गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडतात. त्यामुळे अजून ३ ते ५ दिवस ही सूर्यकिरणे दिसणार आहेत. सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन संक्रमणाच्यामुळे व मंदिराचे अद्भुत वास्तूनिर्मिती व शास्त्र यामुळे दरवर्षी मार्च व सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा किरणोत्सव (Kirnotsav) होतो.
मंदिराचे अभ्यासक यांच्या नित्य निरिक्षणातून या किरणोत्सवास प्रसिद्धी मिळाली आहे. १२०० व्या शतकातील पुरातन हेमाडपंथी हे श्रीगोंदेश्वर महादेव मंदिर असून या मंदिरात सध्या पहाटे सूर्योदयच्या वेळी सूर्याची किरणे गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडून किरणाभिषेक होऊन किरणोत्सवाचा सोहोळा अनुभवता येतो. दरवर्षी मार्च व सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात गोंदेश्वर महादेव मंदिरात हा किरणोत्सव ६ ते ७ दिवस सुरू असतो. सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन संक्रमणाच्या परिभ्रमणमुळे व मंदिराचे वास्तुशास्त्र यामुळे हा निसर्गाचा आविष्कार घडून येतो.
दरम्यान, हा सोहळा दुर्मिळ ठिकाणीच घडतो. यात महाराष्ट्रात (Maharashtra) कोल्हापूरच्या (Kolhapur) श्रीमहालक्ष्मी मंदिरात सूर्यास्ताच्या वेळी किरणोत्सव होतो. माझ्या अनेक वर्षांच्याचा निरिक्षणातून मला हा सोहळा निदर्शनास आला. या गोंदेश्वर महादेव मंदिरात रवी कोठूरकर, सागर जंगम, अभिषेक उगले, तेजस जगताप,सतीश सूर्यवंशी, सुनील खुळे शशी आंधळे हे नियमित १२ महिने दररोज पहाटे नित्यनियमाने स्वखर्चाने अभिषेक व पूजा करीत आहेत.