Tuesday, May 21, 2024
HomeनाशिकNashik News : मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळली; दोघे गंभीर जखमी

Nashik News : मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळली; दोघे गंभीर जखमी

वणी | Vani

येथील सप्तशृंगी गडालगत (Saptshringi Fort) असलेल्या मार्कंडेय पर्वतावर (Markandeya Mountain) आज सोमवती अमावस्यानिमित्त (Somvati Amavasya) भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच पायवाटेचा मार्ग काढत पर्वतावर चढणाऱ्या दोन भाविकांवर दरड कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे…

- Advertisement -

Trimbakeshwar News : सोमवती अमावस्यानिमित्त त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने फुलली

याबाबत अधिक माहिती अशी की, मार्कंडेय पर्वतावर दरवर्षी सोमवती अमावस्यानिमित्त यात्रा भरते. या यात्रेसाठी जिल्ह्यासह विविध राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यातच आज सोमवती अमावस्या असल्याने मार्कंडेय पर्वतावर भाविकांनी (Devotees) मोठी गर्दी (Crowd) केली होती.

Nashik News : देवळालीत बिबट्या जेरबंद

यावेळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाबापूर-मुळाणे बारी मार्गे मार्कंडेय पर्वतावर जाण्यासाठी असलेल्या पायवाट मार्गावर पर्वताची चढाई करणाऱ्या दोन भाविकांवर एक १०० किलो वजनाचा दगड (Stone) निखळून खाली येऊन अंगावर आल्याने बाळु गजराम चारोस्कर (वय ५७) रा. दिंडोरी तळेगाव ता. दिंडोरी आणि अशोक मनोहर गायकवाड (वय ५५) रा. बोरगड म्हसरुळ नाशिक हे दोघे गंभीर जखमी झाले.

Trimbakeshwar News : दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून; शोधमोहीम सुरू

दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ दोन्ही जखमींना (injuerd) उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पाठविण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या