त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
श्रावण महिन्यात (Shravan Month) त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर (Road) रेलचेल बघायला मिळते. यावर्षी देखील पहिल्या सोमवारपासूनच त्र्यंबकेश्वरला भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यानंतर आज दुसऱ्या सोमवारी देखील त्र्यंबकला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे ‘हर हर महादेव आणि बम बम भोले’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.
काल (रविवारी) रात्रीच भाविकांनी ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी (Circumambulation of Brahmagiri) त्र्यंबकेश्वरला गर्दी केली होती. रात्री कुशावर्त कुंडावर (Kushavart Kund) अंघोळ करून पुढे त्र्यंबकराज मंदिरात (Trimbakraj Temple) दर्शन घेऊन भाविक प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होतांना दिसून आले. नेहमीप्रमाणे प्रशासन तिसर्या सोमवारसाठी सज्ज होत असतानाच भाविकांनी दुसर्या सोमवारीच मोठी गर्दी केल्याने प्रशासनाचा अंदाज काहीसा चुकल्याचे दिसले.
प्रदक्षिणा मार्गावर रात्रीपासूनच भाविकांची गर्दी (Crowd of Devotees) असून, काहीजण प्रदक्षिणा आटपून परतत आहे. त्यामुळे कुशावर्त कुंडावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. या गर्दीचा अंदाज प्रशासनाला (Administration) सकाळी आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
दुसरीकडे त्र्यंबकराज मंदिर, संत निवृत्तीनाथ मंदिर, मेनरोड आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी आहे. तर खाजगी वाहनांना (Private Vehicles) आतमध्ये प्रवेश बंद केल्याने प्रदक्षिणा मार्ग ते गजानन महाराज संस्थानपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.





