Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याटोळक्याकडून एकास मारहाण

टोळक्याकडून एकास मारहाण

नाशिक । प्रतिनिधी

दुकानदारास शिवीगाळ करतांना हटकल्याने संतप्त टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.१७) वीरसावरकरनगर भागात घडली. या घटनेत टोळक्याने तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने तो जखमी झाला आहे.

- Advertisement -

देविदास तोरणे उर्फ दादू उर्फ घोड्या,वैभव पाटेकर व त्यांचा एक साथीदार अशी मारहाण करणार्‍या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश नंदकिशोर शहाणे (२४ रा.गडाखचाळ,वीरसावरकरनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.

शहाणे रविवारी अंडी घेण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. सावरकरनगर येथील अरूण इंटरप्रायझेस शेजारून जात असतांना केक शॉप मध्ये संशयीत मालकास मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते. यावेळी शहाणे यांनी येथे शिवीगाळ करू नका असे हटकल्याने ही हाणामारी झाली.

यावेळी संतप्त टोळक्याने आमच्या नादी लागू नकोस असे म्हणत थेट शहाणे याच्यावर हल्ला चढविला. यावेळी शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तर एका संशयीताने त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या घटनेत शहाणे जखणी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारहाण दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या