Friday, April 25, 2025
Homeनाशिकनियम न पाळणार्‍या स्कूलबसवर कारवाई – पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील

नियम न पाळणार्‍या स्कूलबसवर कारवाई – पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील

नाशिक । प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सर्वस्वी जबाबदारी ही शाळेची आहे. तसेच, शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाच प्राधान्यक्रम दिला पाहिजे. नियमांचे पालन न करणार्‍या शालेय विद्यार्थ्यांनी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कायदेशीर कारवाई पोलिसांकडून केली जाईल असे स्पषट संकेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले.

- Advertisement -

पोलीस मुख्यालातील बॅरेक क्रमांक ७ येथील भीष्मराज बाम सभागृहात शहर वाहतूक शाखा आणि शहरातील स्कुलबस, खासगी स्कुलबस, स्कुलव्हॅन प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.  सदरच्या बैठकीमध्ये शासनाच्या शालेय शिक्षर व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांची चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करून त्यानुसार कामकाज करणे, या समितीमध्ये पोलिसांचा समावेश करण्याच्या सूचना आयुक्तांनी केली.

तसेच, शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी दोन ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती शाळेने करणे अनिवार्य आहे. शाळेच्या आवारात पोलीसांचा क्युआर कोड लावण्यात यावा. शालेय बसची तपासणी करण्यात येऊन ओळखपत्र देण्यात यावे, शाळांमध्ये एक पोलीस काका आणि पोलीस दिदी ही संकल्पना राबविण्यात यावी. बसचालकाकडे पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस ठाण्याच्या क्रमांक असणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शाळांच्या वेळापत्रकात बदल करावा, पालकांना तक्रार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कुल बस, रिक्षा, व्हॅनवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी स्कुल बस प्रतिनिधींनीही येणार्‍या समस्या मांडल्या.

या बैठकीला शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यंवशी, पोलीस निरीक्षक फुलदास भोये, सदानंद इनामदार, अनिल पवार, कैलास पाटील, भारतकुमार सूर्यवंशी, निलेश माईनकर यांच्यासह स्कुल बस, खासगी स्कुल बस, व्हॅनचालक असे 82 प्रतिनिधी उपस्थित होते..

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना म्हाडाचे घर- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा...