Friday, April 25, 2025
Homeनाशिकएक वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

एक वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी 
एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या भांड्यात पडून दुर्दैैवी अंत झाल्याची घटना उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाथरूममधील टबमध्ये बुडून या मुलाचा मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी- अबिद मोहित शेख (वय १ वर्षे, रा. ट्रॅक्टर हाऊस, नाशिक) याची मावशी डीजीपीनगर संतोषीमाता नगर येथील साईर कुटीर सोसायटीत राहते. तिची नुकतीच प्रसूती झाली. तिची बहीण फुलमती खातून ही आपला लहान मुलगा अबिदला घेऊन बहिणीच्या घरी गेली होती.
काल रात्री कुटुंबियांनी जेवण घेतले. फुलमती अबिदला जेऊ घालत होती. अचानक त्यांना पतीचा फोन आला. फोनवर बोलत बोलत अबिदची आई बाल्कनीत गेली. आईचे दुर्लक्ष असतानाच अबिद हा बाथरुममध्ये गेला. तेथे पाण्याने भरलेला टब होता. त्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो...

0
पुणे(प्रतिनिधी) आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११...