Saturday, November 23, 2024
Homeनाशिकअसंघटीत क्षेत्रासाठी ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना

असंघटीत क्षेत्रासाठी ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना

सातपूर । प्रतिनिधी

असंघटीत क्षेत्रातील छोटे व्यापारी व कामगारांसाठी शासनाद्वारे सूरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन’ पेन्शन योजनेच्या नोंदणीला प्रारंभ करण्यात आला असून, या योजनेची माहीती देऊन त्याबद्दलच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी कामगार उपायुक्तांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली.

- Advertisement -

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन’ पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारने विशेष लक्ष केंद्रीत केले असून शासनाच्या विविध विभागांना यात संमललित करुन योजना सक्षमपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने काल कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भविष्य निर्वाह निधी विभागाचे प्रादेशिक आयुक्त-२ रमेश कुमार, लेखाधिकारी ललित लहामगे, जीवन विमा प्राधिकरणाचे वरिष्ठ शाखाधिकारी अरुर वाघ, शाखाधिकारी अरुण सोनवणे, महाराष्ट्र चेंबरचे सचिव चंद्रकांत दिक्षीत, अविनाश पाठक हे होते.

यावेळी झालेल्या चर्चेत पेन्शन याजना कोणाकोणासाठी लागू आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया कशी केली जाते.कोठे केली जाते. याबद्दल सविस्तर माहीती श्री दाभाडे यांनी दिली. शासनाद्वारे देण्यात आलेले परिपत्रकही त्यानी वाचून दाखविले.रमेश कुमार यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या माध्यमातून याबाबत जनजागरण करण्यात येत असल्याचे सांगून नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.

पेन्शन योजना ही सर्वसामान्य कामगार व्यापारी टपरीधारक दूकानदार व कष्टकर्‍यांसाठी आहे. यात 15 हजार रुपयांच्या आतील उत्पन्न असणार्‍या लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे. वयाच्या १८ ते ४० वर्षादरम्यान कोणीही नागरीक आपले नाव नोंदवू शकतो. यासाठी आधार कार्ड व जनधन अथवा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. या आधारावर सेतू कार्यालय अथवा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नोंदणी केली जातेे. त्यानंतर वयोमानानुसार दरमहा ४५ ते २०० रुपये निधी खात्यातून थेट कपात केले जाणार आहे. तेवढीच रक्कम सरकारद्वारे जमा केली जाणार आहे. वयाच्या ६० वर्षानंतर त्या व्यक्तीला ३ हजार रुपये पेन्शन सूरु होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या