Saturday, November 23, 2024
Homeनाशिक‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’द्वारे घरबसल्या करा नावनोंदणी

‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’द्वारे घरबसल्या करा नावनोंदणी

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार जिल्ह्यात मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. आयोगाने यंदा मतदारांसाठी वोटर हेल्पलाईन अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे मतदार घरबसल्या अ‍ॅनराईड मोबाईलवर नाव नोंदणी व दुरुस्ती करु शकतात. त्यासाठी मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेट्या मारण्याची गरज भासणार नाही. देशात महाराष्ट्र व हरियाणा वगळता उर्वरीत राज्यात अ‍ॅपच्या माध्यमातून ३ कोटी नागरिकांनी नावनोंदणी व दुरुस्ती केली आहे.

- Advertisement -

मतदार याद्या शुध्दीकरणाचा कार्यक्रम आयोगाकडून गत पाच वर्षापासून सुरु आहे. त्यात दुबार, स्थलांतरीत, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे कमी कऱण्यासह अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. बीएलओंना प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदाराची पडताळणी करावयाची आहे. शिवाय आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये त्यांची माहीती भरुन नंतर कुटुंब प्रमुखांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे बिएलओंनाही खरी पडताळणी करावी लागणार आहे.

प्रत्येक मतदारांचा मोबाईल नंबर त्याच्या मतदार नोंदणी क्रमांकास जोडला जाणार आहे. त्यावरच त्याला मॅसेजही दिले जातील. त्यामुळे एक व्यक्ती एकच ठिकाणी आपले नाव नोंदवू शकेल. एका नंबरला एकच खाते उघडता येईल. त्याचे लॉगीन आयडी, पासवर्डही त्याला तयार करावे लागेल. त्यावरच वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. त्यानंतर त्याला लॉगींन करता येईल. त्यामुळे एकापेक्षा जास्त नावांना हा नंबर वापरता येणार नाही. त्यामुळे आयोगाने सुरु केलेल्या या उपक्रमात सर्वच मतदारांनी स्वत:हून पुढे येत पडताळणी करुन घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतने करण्यात आले आहे.

मागील ११ नोव्हेंबरला मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला. येत्या २० डिसेंबर पर्यंत ही मोहीम जिल्ह्यातील १५ मतदारसंघात राबविली जाणार आहे. ३० डिसेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होईल. ३० डिसेंबर ते ३० जानेवारी या कालावधीत मतदार यादीबाबत दावे व हरकती स्विकारल्या जातील. १० फेबु्रवारीपर्यंत प्राप्त हरकती निकाली काढण्यात येतील. त्यानंतर प्राप्त माहितीचे अद्यावतीकरण व पुरवणी याद्यांची छपाई केली जाईल. २ मार्च २०२० ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या