Monday, November 18, 2024
Homeनाशिकमहिनाभरात २५३ डेंग्युचे रुग्ण

महिनाभरात २५३ डेंग्युचे रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेकडून केल्या जाणार्‍या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याचे शहरात डेंग्यु साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. डिसेंबर महिन्यात २५३ डेंग्यु रुग्ण आढळले. महापालिका हद्दीत २०१९ मध्ये ११२४ डेंग्यु रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

शहरात डेग्युचा प्रकोप दोन वर्षांपासून सुरूच असून यापुर्वी देखील अशीच स्थिती असल्याने आरोग्य संचालकांनी डेंग्यु आटोक्यात आणण्यासाठी विशेष कार्यशाळा घेतली होती. महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्वच्छतेसंदर्भात व डेग्यु साथ आटोक्यात आणण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते. असे असतांना साथ वाढत गेल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी डॉक्टराचे पथक तयार करुन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. तसेच खाजगी रुग्णांना ठराविक चाचण्या झाल्यानंतरच डेंग्यु लागण झाल्याचे जाहीर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते. यानंतर मात्र डिसेंबर महिन्यातील डेंग्यु बाधीतांचा आकडा कमी झाला आहे.

शहरात जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यात केवळ १२ डेंग्युचे रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यात ४८, ऑगस्ट ११७, सप्टेंबर १६५, आक्टोंबर २०७, नोव्हेंबर ३२२ व डिसेंबर २५३ अशाप्रकारे डेंग्यु रुग्ण आढळून आले आहे. शहरात आरोग्य विभागाकडून होणारी औषध व धूर फवारणी, डासाची उत्पत्तीस्थाने शोध मोहीम यांचे काम प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या