Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकअखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभा राष्ट्रीय अधिवेशन : पुरोहितांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनाची...

अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभा राष्ट्रीय अधिवेशन : पुरोहितांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनाची गरज- महेश पाठक

नाशिक | प्रतिनिधी

तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी कार्यरत पुरोहितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी मजबूत संघटनेची गरज असून त्यासाठी प्रत्येक प्रदेशात स्वतंत्र अध्यक्ष निवडावे असे प्रतिपादन अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी केले.

- Advertisement -

लेउवा पाटीदार भवन, रामकुंड येथे काल  दि.१९ आयोजित केलेल्या अखिल भारतीय तीर्थपुरोहित महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशानात ते बोलत होते. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष व वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश शुक्ल, वरिष्ठ महामंत्री श्रीकांत वशिष्ठ, नवीन नागर, जयंत शिखरे, राष्ट्रीयमंत्री दिलीप शुक्ल, वरिष्ठ उपाध्यक्ष रामकृष्ण तिवारी, चिटणीस हेमंत तळाजिया आदी उपस्थित होते.

पाठक यांनी अध्यक्षीय भाषणात तीर्थ पुरोहितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत;असल्याकडे लक्ष वेधले.यासाठी संघर्ष करायला लागत असल्यामुळे सर्वांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.अन्यायाला एकावेळी विरोध करून चालणार नाही. त्यासाठी वारंवार प्रयत्न करावा लागणार असून युवाशक्तीशिवाय कोणताही संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक प्रदेशासाठी अध्यक्ष निवडून त्यांच्या माध्यमातून संघटना वाढवावी असे आवाहन पाठक यांनी केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी रामकुंडावर गंगांपूजन करण्यात आले. त्यानंतर पंचवटी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.अमर डिब्बीवाला यांची युवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पाठक यांनी केली. दिनेशशास्त्री गायधनी व भालचंद्रशास्त्री शौचे यांनी मंत्रघोष केला. वेदवेदांग पुरस्कार मिळाल्याबद्दल दिनेशशास्त्री गायधनी यांचा सत्कार करण्यात आला. कीर्ती शुक्ल व नृत्यानंद कथक अकादमीचे शिष्य यांनी गणेशवंदना सादर केली. ऍड. भानुदास शौचे यांनी सूत्रसंचालन केले. रात्री गोदावरीची आरती करण्यात आली. त्यानंतर मोहन उपासनी यांचा वेणूनाद हा बासरी वादनाचा कार्यक्रम झाला.

पुरोहितांची शक्ती, ऊर्जा एकत्रित संघटित करणे यासाठी ं हे अधिवेशन बोलावले आहे. पुरोहितांचा विकास व्हावा. सन्मान वाढावा, यासाठी देशभरातील तीर्थपुरोहित वर्ग संघटित झाला पाहिजे असे सतीश शुक्ल यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या