Friday, April 25, 2025
Homeनाशिकवै. बस्तीरामजी सारडा पुण्यतिथी सोहळ्यास आज आरंभ

वै. बस्तीरामजी सारडा पुण्यतिथी सोहळ्यास आज आरंभ

नाशिक । प्रतिनिधी

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या ५६ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेचा प्रारंभ आज होत आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ६ वाजता व्याख्यान सुरू होईल.

- Advertisement -

प्रतिवर्षाप्रमाणे सर्वपरिचित व्याख्याते ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर हे ‘संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री’ या विषयावर यंदाची व्याख्यान पुष्पे गुंफतील. गेली ५५ वर्षे महाराष्ट्रातील नामवंत विद्वान वक्त्यांची व्याख्याने या व्याख्यानमालेत नाशिककर रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळाली आहेत.

श्रोत्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळेच व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू आहे. परिसरातील आणि आजूबाजूंची गावे व तालुक्यांतील रसिक श्रोतेसुद्धा या व्याख्यानमालेचा आवर्जून लाभ घेतात. व्याख्याने ठरल्यावेळी सुरू होतात. त्याकामी श्रोत्यांचे सहकार्यसुद्धा कौतुकास्पद आहे. म्हणून नियमितपणाचा लौकिक या व्याख्यानमालेने आजवर टिकवला आहेे. आजपासून सुरू होणार्‍या व्याख्यानमालेचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...