मालेगाव l प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील जळकू येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. देविदास रघुनाथ शिंदे (वय ४२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
- Advertisement -
यंदा पावसाळा चांगला होता शिंदे यांनी काबाड कष्ट करून शेतात पिकांची लागवड केली होती. मात्र अचानक आलेल्या अवकाळीने पावसाने शिंदे यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
शिंदे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे ८० हजार रुपये कर्ज होते. जिल्हा बँकेने नुकतेच शिंदे यांना नोटीस पाठवून जमीन नावे करण्याची नोटीस दिली होती.यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे आर्थिक विवंचनेत होते. दरम्यान, आज त्यांनी शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.