Saturday, May 4, 2024
Homeनाशिक‘करोना’बाबत सर्व आदेश जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध

‘करोना’बाबत सर्व आदेश जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध

नागरिकांनी संकेतस्थळावर भेट देऊन योग्य खबरदारी घ्यावी  : मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

करोनासंदर्भातील सर्व आदेश तसेच परिपत्रके जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी संकेतस्थळावर भेट देऊन योग्य ती काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

करोना या जागतिक आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत विविध उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे विविध आदेश, परिपत्रके निर्गमित करण्यात आली आहेत. ही सर्व परिपत्रके व आदेश एकत्रित नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ती उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे आपल्या आदर्श अंमलबजावणी प्रणालीनुसार काम करत असते. जिल्ह्यात करोनाच्या आपत्तीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्हाधिकारी नाशिक तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांच्याद्वारे करोना विषाणू संसर्ग साथरोग या विषयाच्या अनुषंगाने काढण्यात आलेले वेगवेगळे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्याwww.nashik.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

नागरिकांनी अधिकृत आदेश/परिपत्रकांसाठी संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या