Tuesday, November 19, 2024
Homeनाशिकवृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी

मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहेत. अ-श्रेणीसाठी रुपये ३१५० रु., ब श्रेणीसाठी २७०० रु. तर, क श्रेणीसाठी २२५० रु. मानधन दिले जाते. या योजनेसाठी कलाकार निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती प्रति जिल्हा १०० कलाकारांची निवड करते.

- Advertisement -

सध्या मानधन मिळत असलेल्या कलावंतांनी त्यांचे हयातीचे दाखले जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे सादर करावेत. दाखले सादर न करणार्‍या कलावंतांचे मानधन एप्रिल, २०१९ पासून रोखण्यात येणार आहे. ज्या कलावंतांना मानधन मंजूर आहे, पण काही कारणास्तव त्यांचे मानधन थांबले आहे, अशा कलाकारांनी कार्यालयाकडे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२२-२२८४२६७० किंवा ०२२-२२८४२६३४

तर, कार्यालयाचा ई-मेल [email protected] / [email protected] असा आहे. महाराष्ट्रातून जिल्हानिहाय कलावंतांचे अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असून, अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दि.३१ जानेवारी २०२० आहे. कलावंतांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे सादर करावेत. ३१ जानेवारीनंतर प्राप्त होणारे कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या