Saturday, November 23, 2024
Homeक्रीडादेशदूत व नाईस औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्र चेंबर विजेता; आयमा उपविजेता

देशदूत व नाईस औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्र चेंबर विजेता; आयमा उपविजेता

सातपूर। प्रतिनिधी

दै. देशदूत व नाईस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या संघाने सातव्यांदा विजेतेपद पटकावले तर आयमाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.महात्मानगर क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या औद्योगिक चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना महाराष्ट्र चेंबर व आयमा यांच्या संघादरम्यान रंगला.

- Advertisement -

महाराष्ट्र चेंबरने प्रथम फलंदाजी करीत १०८ धावांंचे विशाल लक्ष्य निवेकपुढे ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना आयमा संघ पुरता ढेपाळलेला होता. ८ षटकांत ४८ धावा त्यांना करता आल्याने उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.  गेल्या १५  वर्षांत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने ६ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. ही अजिंक्यपद जिंकण्याची सातवी वेळ आहे तर आयमाने यापूर्वी दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे.

सकाळी ८ वाजता सामन्यांचा शुभारंभ नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस समिर रकटे यांच्या हस्ते करण्यात आले. निवेक व महाराष्ट्र चेंबर यांच्यात रंगला. या सामन्यात महाराष्ट्र चेंबरच्या संघाने ५७ धावा केल्या होत्या. निवेक संघावर ३ धावांनी निसटता विजय मिळवला होता.

दुसरा सामना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स व आयमा या संघांत रंगला. त्यात इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स संघाने ५७ धावांचे आव्हान आयमा संघापुढे ठेवले होते. आयमाने हे लक्ष ४ षटकांतच पूर्ण केले.  तिसर्‍या सामन्यात आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंंजिनिअर्स व लघु उद्योग भारती या संघामध्ये झाला. यात प्रथम फलंदाजी करताना आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंंजिनिअर्स संघाने १०३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लघु उद्योग भारती संघ ३५ धावांत गारद झाला.

पहिल्या सेमी फायनलच्या सामन्यात बाय मिळालेल्या निमा संघाचा सामना आयमा संघासोबत झाला. यात प्रथम फलंदाजी करताना आयमा संघाने ८३ धावा केल्या. निमाचा संघ मात्र ४९ धावाच करू शकला. आयमा संघ फायनलमध्ये दाखल झाला.
दुसर्‍या उपांत्यफेरीचा सामना आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंंजिनिअर्स व व महाराष्ट्र चेंबर यांच्यात झाला. हा सामना जिंकून महाराष्ट्र चेंबरचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला.

अंतिम सामन्यासाठी परिसरातील उद्योजकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर परिवारासह उद्योजक मैदानावर उपस्थित होते. या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी नाईसचे माजी उपाध्यक्ष रमेश वैश्य, संजीव नारंग, आयमा माजी अध्यक्ष बाबूराव सोनार, निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष मगर पाटील, आर्किटेक्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नीलेश चव्हाण, समीर भुतानी, सुनीता सारडा, मंजू राठी, तेजपाल बोरा, नरेंद्र बिरार, मनीष कोठारी, राजेंद्र आहेर, बलबिरसिंग छाब्रा, प्रशांत साठे, शेख शहाबुद्दीन, यु. के.शर्मा, गिरीश पोद्दार, सुनीता फाल्गुने, स्मिता मंडलेचा, संदीप सोनार, राधाकृष्ण नाईकवाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्योजक, महिला व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवेकचे व्यवस्थापक दिनेश पाटील, संतोष पाखले, संजय जाधव, काशिनाथ महाले, संदीप महाले, राजू काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सामन्यांमध्ये सातत्य कौतुकास्पद : कोठावदे
‘देशदूत’ने सातत्यपूर्ण उपक्रम राबवून सलग १६ वर्षे उद्योजकांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धांचे आयोजन निश्चितच कौतुकास्पद असून उद्योजकांना खेळाचा आनंद देण्याचा उद्देश प्रेरणादायी ठरणार असल्याचे सीआयआयचे उत्तर महाराष्ट्राचे चेअरमन गणेश कोठावदे सांगितले. यावेळी देशदूत व नाईसचे चेअरमन विक्रम सारडा यांनी क्रिकेटशी नाते हे २००५ पासून असून, या खेळाला सलग १६ वर्षे सन्मान देऊन विविध संघटनांच्या संघांनी सहभाग घेत यशस्वी केल्याबद्दल समाधान वाटल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर ‘देशदूत’चे संचालक जनक सारडा, नाईसचे संचालक संजीव नारंग, अल्पा वरीया, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा हे होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक रवींद्र केडिया यांनी केले, तर आभार संजीव नारंग यांनी मानले.

क्षणचित्रे
फलंदाजी करताना आयमाच्या खेळाडूने स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका फिरवताना स्टंपच्या लगत क्षेत्ररक्षण करणार्‍या इन्स्टिट्यूशनच्या खेळाडूच्या भुवयांवर जोरात बॅट लागल्याने त्यांना सिक्स सिग्मा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले.

महाराष्ट्र चेंबर अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर चेंबरच्या समर्थकांनी व्हिसल वाटप केल्या. सामन्यात प्रत्येक चौकाराला व्हिसल वाजवून मैदान दणाणून सोडले होते.

निमा व आयमाच्या सामन्यासाठी बलबिरसिंग छाब्रा यांनी प्रत्येक चौकाराला १०० रुपये तर प्रत्येक षटकाराला २०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या