सातपूर । प्रतिनिधी
दैनिक ‘देशदूत’ व ‘नाईस’ यांच्या संयुक्त विद्यमाने २००५ पासून औद्योगिक संघटना पदाधिकार्यांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोंजन केले जाते. या स्पर्धेसाठी निमा, आयमा, नाईस, निवेक, लघु उद्योग भारती, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, निपम, क्रेडाई, सीए असोसिएशन, आयएमए, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन अशा १२ संघांतून ‘प्रथम येणार्यांना प्रथम प्राधान्य’ या तत्वावर ७ संघ निवडण्यात आले.
या संघांचे क्रिकेटचे सामने आज (दि. १८) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेेदरम्यान महात्मानगर मैदानावर खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेेचा शुभारंभ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस समीर रकटे यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे.
या स्पर्धा टेनिसच्या चेंडूवर खेळवल्या जाणार आहेत.
या स्पर्धेचा पहिला सामना निवेक संघ व गतविजेत्या महाराष्ट्र चेंबर या संघांमध्ये रंगणार आहे. दुसरा सामना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स व आयमा यांच्यात खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना लघु उद्योग भारती व आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स या संघांत होणार आहे. निमा संघाला बाय मिळाला आहे.
या स्पर्धेचे लॉटस् जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. या स्पर्धेचा समारोप सायंकाळी सामने संपल्यानंतर लगेचच मैदानावरच करण्यात येईल. पुरस्कार वितरण सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे चेअरमन गणेश कोठावदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शाह, दै. देशदूत व नाईसचे चेअरमन विक्रम सारडा हे राहणार आहेत. उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.