Saturday, October 19, 2024
Homeनाशिकविरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजना कार्डचे रविवारी वितरण

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजना कार्डचे रविवारी वितरण

जुने नाशिक । प्रतिनिधी

मध्य नाशिकच्या आ. फरांदे यांनी ९ ऑगस्ट २०१९ रोजी बी.डी.भालेकर विद्यालयात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पंधरा दिवसाचे महाशिबिर आयोजित केले होते. या योजनेतील लाभार्थ्यांना आंतरदेशीय पत्र पाठवून योजनेची माहीती देत या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाशिबिराचे आयोजन केले होते.आयुष्यमान भारत योजनेच्या ७ हजार लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्डचे वितरण येत्या रविवार (दि.२९) रोजी दुपारी ४ वा. चोपडा लाँन्स, नाशिक येथे होणार आहे.

- Advertisement -

नागरिकांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन या शिबिराचा कालावधी वाढविण्यात येऊन सतरा दिवस करण्यात आलेला होता. या महाशिबिरात नावे नोंदविलेल्या ७ हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणार आहे.

आ.गिरिष महाजन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, खा. भारती बागूल, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, महापौर सतिष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहे. लाभार्थींनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आ. फरांदे यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या