इंदिरानगर । वार्ताहर
महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्र जळाल्याने दि १५ शुक्रवार संध्याकाळी सहा वाजेपासून इंदिरानगर व पाथर्डी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता
वीज पुरवठा खंडित झाल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कामकाज पोलीस कर्मचारी व ठाणे अंमलदार मोबाईलच्या टॉर्च च्या उजेडात आपले दैनंदिन काम करून कर्तव्य निभावत होते.
अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कुठलीही सोय इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही जनरेटर आहे हे ते पण बंद स्थितीत आहे कुठलाही एमर्जन्सी लाईट अथवा इन्वर्टर पोलिस ठाण्याला उपलब्ध नाही त्यामुळे अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला तर पोलिसांना मोबाईलच्या उजेडा त दैनंदिनी काम करावे लागत आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना खूप कसरत करावी लागत आहे.
शहरात काल संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पाथर्डी येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने येथून निघणाऱ्या आठ विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता वीज पुरवठा पूर्णपणे बंद पडला होता इंदिरानगर, राजीवनगर, वासन नगर,नयनतारा, पार्क साईड, वडनेर, पाथर्डी याभागात संध्याकाळपासून विद्युत पुरवठा बंद होता.