Monday, May 27, 2024
Homeनाशिकमनमाड : रमजान ईद निमित्त कोणतीही नवीन वस्तू खरेदी न करता गोरगरिबांची...

मनमाड : रमजान ईद निमित्त कोणतीही नवीन वस्तू खरेदी न करता गोरगरिबांची मदत करण्याचे मौलानांचे आवाहन

मनमाड । प्रतिनिधी

देशावर करोनाचे आलेले संकट पाहता यंदा मनमाड शहरात सर्व मुस्लीम बांधवानी साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी करण्या बरोबरच ईद निमित्त नेहमी केली जाणारी खरेदी न करता सर्व जाती धर्मातील गोरगरीब,गरजू यांना मदत करावी असे आवाहन शहरातील सर्व प्रमुख मौलाना यांनी केले आहे.

- Advertisement -

शिवाय लॉक डाऊनचा उल्लघन करू नये,शासनाने लागू केलेले सर्व नियम तंतोतन पाळावे असे ही आवाहन मौलानांनी केले.त्यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील सर्व मुस्लीम बांधवानी उस्फुर्त प्रतिसाद देत यंदा ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील ईद साध्या पद्धतीने साजरी करावी असे बोर्ड देखील मस्जिदच्या गेटसमोर लावण्यात आलेले आहे.

इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्याला एक आगळेवेगळे महत्व व स्थान आहे त्यामुळे जगभरातील मुस्लीम बांधव या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात.या महिन्यात रोज ५ वेळा नियमितपणे अदा केली जाणाऱ्या नमाज व्यतिरिक्त तरावीह ची विशेष नमाज देखील अदा केली जाते.शिवाय संपूर्ण महिना रोजे धरले जातात त्यासाठी पहाटे सहेरी केली जाते तरसायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा इफ्तार केला जातो .रमजान महिना सुरु होताच गाव असो अथवा मोठे शहर सर्व ठिकाणाची मस्जिदी मध्ये मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी असते . शिवाय या महिन्यात जकात आणि फित्रा देखील मोठ्या प्रमाणात दिला जातो.

मात्र, यंदा देश आणि जगावर करोनाचे संकट आले त्यामुळे लॉक डाऊन लागू करण्यात आला असल्याने त्याचे तंतोतन पालन केले जात असल्याने शहरातील सर्व मस्जीदीत फक्त मौलाना आणि ३ जण नमाज अदा करीत असून इतर सर्व मुस्लीम बांधव हे आपापल्या घरात नमाज रोजा इफ्तार करूं नमाज अदा करीत आहे.

रमजान महिना शेवटच्या टप्प्यात आला असून अवघ्या काही दिवसावर ईद येवून ठेपली आहे मात्र करोनाचा संकट अजून ही देशावर कायम आहे त्यामुळे यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करावी असे आवाहन शहरातील प्रमुख मौलानांनी केले.शिवाय कोरोनामुळे २ महिन्या पासून लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे हातावर असलेल्यांची सर्व जातीधर्मांच्या लोकावर उपासमारी वेळ आली असल्याने ईद निमित्त कोणतीही नवीन वस्तू खरेदी न करता या गोरगरिबांची मदत करण्याचे आवाहन देखील मौलानांनी केले असून त्यांच्या ह्या आवाहनाला शहरातील मुस्लीम बांधव कडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे

देशावर आलेले करोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे-

आम्ही भारतीय मुस्लिम असल्याचा आम्हाला अभिमान आहे.देशावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे आम्ही देखील सरकार सोबत आहोंत… करोनामुळे आमच्या हिंदू बांधवांनी रामनवमी,हनुमान जयंती,गुडी पाडवा,जैन बांधवांनी महावीर जयंती,भीम सैनिकांनी डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी केली मग आम्ही ईद धुमधडाक्यात कशी साजरी करू शकतो आम्ही देखील या देशाचे केवळ नागरिक नव्हे तर देशभक्त नागरिक आहोत.भारतातील कोणताही मुस्लिम शासनाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही.यावर्षी आम्ही ईद अगदी साधेपणाने साजरी करणार आहोत.कोरोनामुळे प्रथमच रमजान महिन्यात घरात नमाज अदा करण्याची वेळ आली मात्र येथे ही प्रत्येक नमाज मध्ये आम्ही देशावर आलेले करोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी विशेष दुवा करीत आहे
मौलाना अस्लम रिझवी साहेब, जामा मशीद,मनमाड

- Advertisment -

ताज्या बातम्या