Wednesday, November 20, 2024
Homeनाशिकनॅब म्हणजे स्टँडर्ड ऑफ लाइफचा वस्तुपाठ- प्रा. येवले

नॅब म्हणजे स्टँडर्ड ऑफ लाइफचा वस्तुपाठ- प्रा. येवले

नाशिक । प्रतिनिधी

भाग्य नियतीच्या हाती असले, तरी येणार्‍या संकटाला न घाबरता तोंड दिल्यास विजय निश्चित मिळतो. त्याचा प्रत्यय या पुरस्काराच्या निमित्ताने आला. आज लिविंग स्टँडर्डचे युग असले तरी स्टँडर्ड ऑफ लाइफ काय असावे याचा वस्तुपाठ नँबसारख्या संस्थांच्या माध्यमातून जगासमोर आलेला आहे. समाजाच्या भावना जिथे बोथट होतात. तिथे नँबसारख्या संस्थांचे कार्य गती घेत असल्याचे चित्र दिसून आले, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

- Advertisement -

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) नाशिक युनिटच्या वतीने दरवर्षी देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय पुरस्कारात मानाचा समजला जाणारा आदर्श प्राध्यापक (अंध) पुरस्कार नागपूर येथील श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख डॉ. प्रा.विनोद आसूदानी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेकडून गेल्या २१ वर्षांपासून आदर्श प्राध्यापक, शिक्षक, संस्था व गुणवंत विद्यार्थी सोहळ्याचे आयोजन केले जाते.

रविवारी (दि.५) सातपूर येथील नाईस सभागृहात या पुरस्कारांचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रा. प्रमोद येवले, लोकनेते गोपीनाथजी मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च संस्थेचे मानद संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री हे होते. पुरस्कारार्थींना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमाला राज्यपातळीवरून सर्व विद्यापीठे, शिक्षण संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्राध्यापक सर्जेराव ठोंबरे यांनी वेदनांच्या पलीकडची संवेदना महत्त्वाचे असल्याचे सांगून वाट्याला आलेल्या संवेदनांची जाणीव करून त्यावर काम करण्याची गरज आहे. करूणाही सार्वजनीक होते, मात्र सामाजिक मनामध्ये संवेदन विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. इतरांना तशी दृष्टी प्रदान करण्याचे काम आपण केले पाहिजे ङ्गअंधार खूप झालाय, पणती तेवत ठेवाफ असे सांगून त्यांनी कार्याचा गौरव केला.

पुरस्कार निवड समितीत संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, महासचिव गोपी मयूर, चेअरमन मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, प्राचार्य अश्विनीकुमार भारद्वाज, प्राचार्य भास्कर गिरीधारी, डॉ. प्रा. सुनील कुटे, डॉ. प्रा. सिंधू काकडे, प्रा.विजय पाईकराव, सचिव म्हणून संपत जोंधळे यांनी काम पाहिले. यावेळी अश्विनीकुमार भारद्वाज,डॉ.सिंधू काकडे,उपस्थित होते.

पुरस्कारार्थी
आदर्श शिक्षक पुरस्कार :- नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील सतीश माणिकराव शेळके (अंध शिक्षक), नांदेड जिल्ह्यातील वसरणी येथील पंकज वसंतराव शिरभाते(अंध शिक्षक), रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील अंध शिक्षक मानसी मधुकर शिंदे, सर्वशिक्षा अभियान अंतर्गत मनपा शाळेतील डोळस शिक्षक वैशाली राहुल वाघ, आदर्श संस्था-लातूर जिल्ह्यातील बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र, विशेष सेवा पुरस्कार मुंबई येथील दूरदर्शन निवेदिका अनघा प्रदीप मोडक यांना तर पदवीधर, बारावी, दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.

अन् सभागृह हळवे झाले
पूरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना दूरदर्शनच्या निवेदिका अनघा फडके यांनी भावनिक भूमिका मांडत सभागृहाला हळवे केले. हा पुरस्कार म्हणजे दृष्टिकोनाचा पुरस्कार आहे. बघणे, पाहणे, दिसणे यात खूप अंतर आहे. संवेदनेसोबत सहानुभूती नव्हे तर सहअनुभूती मिळणे अपेक्षित आहे, असे सांगताना त्यांनी ङ्गतुझ्या पाकळ्या मिटल्या तरी उमलते गंध, मात्र अनेकदा लोकांचा दृष्टीपेक्षा दृष्टिकोनच असतोअंधफ या काव्यपक्ती बोलून दाखविल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या