Saturday, November 23, 2024
Homeक्रीडाअंधाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

अंधाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी

अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांना कालपासून प्रारंभ झाला. राज्यातून अंधांच्या आठ टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत यात विदर्भ मराठवाडा, शेष महाराष्ट्र या संघांनी पहिल्याच दिवशी विजयी घोडदौड सुरू केली आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार हेमंत गोडसे विभागीय क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर लायन्स क्लब कॉर्पोरेट अध्यक्ष राजूभाई व्यास आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आणि अंध खेळाडू ने टाकलेला विशिष्ट पांढरा चेंडू टोलावून मान्यवरांच्यास हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू अमोल कर्चे आणि राष्ट्रीय खेळाडू प्रशांत जगताप यांच्या हस्ते क्रीडा ज्योत क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली उद्घाटन समारंभामध्ये क्रिकेट टीमच्या खेळाडूंसह नाशिक मधील केंब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी खेळाडूंना खिलाडू वृत्ती ठेवून खेळण्याची शपथही देण्यात आली.

या प्रसंगी बोलतानाखासदार हेमंत गोडसे म्हणाले, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंचा व्यक्तिमत्व विकास होत असतो त्यासाठी खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा साहित्यासाठी स्थानिक विकास निधी द्वारे दहा लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करू असे अश्वासन दिले.

यावेळी व्यासपीठावर विकास बिरारी, दिनेश साठी गोविंद सूर्यवंशी तानाजी गायकर मानद अध्यक्ष कल्पना पांडे शालांत परीक्षा बोर्डाचे सचिव नितीन उपासनी नआदी मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेट चे अध्यक्ष राजू व्यास जैन सोशल ग्रुप चे किरण खाबिया आदी मान्यवर उपस्थित होते. २५ रोजी ख्यातनाम अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत संध्याकाळी साडेचार वाजता या सामन्याचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना चांडक विजया दबे गायत्री कोष्टी आकाश कासार किरण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

अशा झाल्या लढती
पहिला सामना नाशिक विरुद्ध विदर्भ संघात झाला विदर्भाने प्रथम फलंदाजी करून २ बाद १६३ धावांचे लक्ष्य उभे केले मात्र नाशिक संघाने ८ बाद ५८ एवढ्या धावा केल्या ज्यामुळे विदर्भ संघ एकतर्फीच विजयी झाला दुसरा सामना शेष महाराष्ट्र परभणी संघात झाला शेष महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करून निबाद १७५ धावांचे विशाल लक्ष परभणी समोर ठेवले हनुमान वाळवे याच्या १०० धावांचा त्यात समावेश आहे मात्र परभणी संघाने ०९.३८ येवढीच धावसंख्या उभारली तिसरा सामना मराठवाडा विरुद्ध मुंबई संघात झाला शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मराठवाड्याने ८०वांचे लक्ष्य मुंबई संघासमोर ठेवले होते

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या