Saturday, May 18, 2024
Homeनाशिकदिंडोरी-कोचरगाव: मागील भांडणाची कुरापत काढून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

दिंडोरी-कोचरगाव: मागील भांडणाची कुरापत काढून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

जानोरी  | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील युवक शिवाजी सुखदेव पारधी(२५) या युवकांचा मागील भांडणाची कुरापत काढून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.सन २०१५ मध्ये नवरात्र देवी विसर्जनाच्या वेळी मयत- शिवाजी सुकदेव पारधी हा कोचरगावचे देवीची मुर्ती ठेवलेली पिकअप गाड़ी चालवित होता. त्यावेळी यातील आरोपी  सोमनाथ
काळू टोंगारे याचे गाडीला सदरच पिकअप गाडीचा कट लागल्यामुळे त्यांचे आपआपसात वाद झाला होता .

- Advertisement -

आरोपी-सोमनाथ काळु टोंगारे व मयत- शिवाजी सुकदेव पारधी यांचेत वैर निर्माण झाले होते . व याचा पोलीस स्टेशन दिंडोरी येथे गुन्हा देखील दाखल असुन मयत- शिवाजी पारधी हा नेहमी कोचरगाव गावातील बाजू  घेवुन कुठल्याही प्रकरणात गावात पुढाकार घ्यायचा त्यामुळे यातील आरोपी यांचा मयत-शिवाजी पारधी याचे बद्दल मनात राग होता.

मनात राग धरून असलेल्या झालेल्या हाणामारीत  शिवाजी सुकदेव पारधी हा मयत झाला असून या संदर्भात एकूण बारा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेवरुन कोचरगाव ता.दिंडोरी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्दगर्शनान्वये योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अधिक तपास कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण तसेच युवराज खांडवी यांसह दिंडोरी पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या