Monday, May 27, 2024
Homeनाशिकतीन महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री...

तीन महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

वाजगाव | शुभानंद देवरे

संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात अत्यावश्यक सेवा बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन वेतन मिळत नसल्याने सध्या कुटुंबाचा गाडा हाकलणे अवघड झाले आहे. कर्मचाऱ्यांना त्वरित थकीत वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने मा.मुख्यमंत्री ठाकरे व ग्रामण विकास मंत्री मा.हसनजी मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

- Advertisement -

संपूर्ण महराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र वेळेचे बंधन न पाळता आपले कर्तव्य बजावत आहे. यासाठी आपल्या सरकारने कर्मचाऱ्याना प्रोत्साहन भत्ता व विमा संरक्षण दिल्याबद्दल कर्मचारी आपले आभार मानले आहेत.

फेब्रुवारी २०२० ते एप्रिल २०२० या तीन महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र गांव पातळीवर इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावत असतांना ना शासनाकडून ना ग्रामपंचायत हिस्स्यातील वेतन मिळत नसल्याने सध्या कुटुंबाचा गाडा हाकलणे अवघड झाले आहे.

शासनाच्या उद्योग व कामगार विभागकडून दर सहामाही जाहीर होणारा विशेष राहणीमान भत्ता दिला जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णयांची पायमल्ली होत असुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना हेतुपुरस्सर वेतन हिस्सा व विशेष राहणीमान भत्यापासून वंचित ठेवून अन्याय केला जात आहे. सदर कर्मचारी यांना मागील थकबाकीसह संपूर्ण विशेष राहणीमान भत्ता मिळावा यासाठी आपले स्थरावर आदेश व्हावा व फेब्रुवारी २० ते एप्रिल २० या तीन महिन्याचे वेतन त्वरित मिळावे अशी मागणी ईमेल व निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने मा.मुख्यमंत्री ठाकरे व ग्रामण विकास मंत्री मा.हसनजी मुश्रीफ यांचेकडे करण्यात आली आहे.

निवेदनावर तानाजी ठोंबरे राज्य अध्यक्ष, बबन पाटील राज्य उपाध्यक्ष, नामदेव चव्हाण राज्य सरचिटणीस, सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे, मिलिंद गणवीर राज्य सचिव आदींच्या स्वाक्षरी आहेत.

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचेकडून वेळेचे बंधन न पाळता अहोरात्र कामे करून घेतली जातात तशी दरमहिन्याला ग्रामपंचायत हिस्सातील वेतन व उद्योग व कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आलेला राहणीमान भत्ता दरमहा नियमित देण्यात यावा.

सखाराम दुर्गुडे ,राज्य सचिव महाराष्ट्र राज्य ग्रा.पं.कर्मचारी संघ (नाशिक)

- Advertisment -

ताज्या बातम्या