Monday, April 28, 2025
Homeनाशिककॅन्सरचे औषध बनवून देण्याचा बहाना; महिलेची दहा लाखाची फसवणूक

कॅन्सरचे औषध बनवून देण्याचा बहाना; महिलेची दहा लाखाची फसवणूक

नाशिकरोड । प्रतिनिधी

कॅन्सरच्या आजाराला आयुर्वेदिक औषध बनवून देतो, असे सांगून एका महिलेची सुमारे सव्वा दहा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पद्मा पवार रा. फ्लॅट नं. ८, सनराईज अपार्टमेंट, जेलरोड, नाशिकरोड या महिलेचे पती राजू पवार हे कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहेत. पवार यांना त्यासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. १ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधित सदर महिलेची कृष्णा (पूर्ण नाव माहित नाही) व त्याच्या चार साथीदारांनी भेट घेऊन तुमच्या पतीला या आजारावर आयुर्वेदिक औषध तयार करून देतो, असे सांगितले.

त्यानंतर या पाच जणांनी पद्मा पवार यांचा मोबाईल नंबर घेऊन वेळोवेळी संपर्क साधला. कृष्णा याने महिलेच्या घरी दुसर्‍या युवकाला पाठवून सदर व्यक्ती भाऊ असल्याचे सांगून औषध तयार करून देतो असे सांगितले. हे औषधे घेण्यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोरील एका दुकानातून काही औषधे घेऊन ती पद्मा पवार यांच्याकडे दिली. काही दिवसांनी कृष्णा याने पुन्हा पवार यांना संपर्क करून महत्वाची औषधे घ्यायची असून त्यासाठी दहा लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले.

या औषधाने पतीची तब्येत ठिक होईल, असे वाटल्याने पवार यांनी बँकेतून दहा लाखाची रक्कम काढली व ती कृष्णा यांच्या साथीदाराकडे सुपूर्द केली. महिलेने संबंधिताकडे पावतीची मागणी केली असता ती कुरीअरने पाठविली जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

त्यानुसार काही दिवसांनी पवार यांना ८ लाख २५ हजाराची पावती मिळाली व उर्वरित रकमेची पावती नंतर देण्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यानंतर पवार यांना औषधे मिळाले नसल्याने त्यांनी फोन केला असता कृष्णा व त्याचा साथीदार यांचे मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पद्मा पवार यांनी उपनगर पोलिसांत कृष्णा व त्याच्या चार साथीदारांविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधितांवर भादंवि ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वपोनि सुनील लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस.बी. खडके हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri सोमवार दि. 28 एप्रिल रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 48 कांदा गोण्याची आवक झाली. एक...