Friday, May 3, 2024
Homeनाशिकजि.प.१९५ शाळांना दुरुस्तीसाठी अडीच कोटी निधी प्राप्त

जि.प.१९५ शाळांना दुरुस्तीसाठी अडीच कोटी निधी प्राप्त

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची मोठ्याप्रमाणात पडझड झालेली आहे.अशा प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील 195 शळांना दोन कोटी 56 लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे.त्यातून प्रत्येक शाळेची मागणीच्या प्रमाणात 50 हजार ते दोन लाखांपर्यंत दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
पावसाने मोठ्याप्रमाणात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली.

- Advertisement -

त्याआधारे राज्य शासनाच्या समग्र शिक्षा विभागातर्फे पहिल्या टप्प्यात साडेसात कोटी रुपये दिले होते. तसेच दुसर्‍या टप्प्यात दोन कोटी रुपये दिल्यामुळे एकूण साडेनऊ कोटी रुपये प्राप्त झाले होते. 2019-20 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहित जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुन्हा दोन कोटी 56 लाख 60 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. यात निफाड (26) व येवला (21) येथील सर्वाधिक शाळांचा समावेश असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद सदस्यांनी मागणी केल्याच्या प्रमाणात सुमारे 50 हजार ते दोन लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. यातून छताची गळती, रंगरगोटी आदी महत्वाची कामे केली जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीने 6 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 94 शाळांसाठी एक कोटी चार लाख 80 हजार रुपये मंजूर केले. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी दुसर्या टप्यात 101 शाळांसाठी एक कोटी 51 लाख 80 हजार रुपये मंजूर केल्यामुळे शाळा दुरुस्तीला वेग येणार आहे.

तालुकानिहाय शाळा
येवला-21
सुरगाणा-8
दिंडोरी-16
सिन्नर-18
बागलाण-13
नाशिक-8
कळवण-11
मालेगाव-11
चांदवड-15
पेठ-4
इगतपुरी-8
त्र्यंबकेश्वर-12
देवळा-7
नांदगाव-7
निफाड-26

- Advertisment -

ताज्या बातम्या