Monday, November 18, 2024
Homeनाशिकनव वर्षाचे जल्लोषात स्वागत!

नव वर्षाचे जल्लोषात स्वागत!

नाशिक । प्रतिनिधी

घड्याळात रात्री १२ वाजेचा पडलेला ठोका.. त्याचवेळी फटाक्यांच्या आतषबाजी.. तरुणाईचा सुरू झालेला जल्लोष अशा झपाटलेल्या वातावरणात शहरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.नववर्षाच्या स्वागतासाठी सायंकाळपासूनच हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाबे गर्दीने फुलून गेले होते. रस्त्या-रस्त्यांवर तरुणाईचा सायंकाळपासून सुरू झालेला जल्लोेष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दिवसेंदिवस  – फोफावत चाललेला चंगळवाद सण, उत्सव माशिवाम नववर्षाच्या  स्वागताप्रसंगी प्रकर्षाने जाणवत होता.

- Advertisement -

हॉटेलमध्मे जेवण आणि संगीत पार्टी केल्माशिवाम समारंभ साजरा होत नसल्माचा समज रूढ होत चालला आहे, त्माचीच पुनरावृत्ती मावेळी पहावमास मिळाली; परंतु माबरोबरच संस्कृतीप्रेमींनी अनेक ठिकाणी मद्यपान करून नववर्ष साजरे करू नका, पाश्चात्म संस्कृतीचे अनुकरण करू नका यासारखे संदेश देत जनजागृती केली, तर काही सामाजिक संस्थांनीही दूधवाटप करून तरुणाईला मद्यप्राशनापासून परावृत्त करण्माचा प्रयत्न केला.

एकीकडे तरुणाईचे बेधुंद जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे भारतीम संस्कृतीचे दर्शन घडवीत काही संस्थांनी रामकुंडावर गोदाकाठी दिवे प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत केले. रात्रीच्मा सुमारास कॉलेजरोड, गंगापूररोड तरुणाईच्मा गर्दीने ओसंडून वाहत होते. रेस्टॉरंटमध्ये  जाऊन खाण्याला अनेक कुटुंबांनी प्राधान्य दिल्याने शहरातील हॉटेल्स गर्दीने हाऊसफुल्ल झाल्यामुळे  उत्साही तरुणाईसह काही कुटुंबांनाही वेटिंग करावी लागली.

वर्षअखेरनिमित्त अनेक कुटुंबांनी पर्यटनाला पसंती दिल्याने  दिवसभर स्थळेही गर्दीने फुलली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी येणारे यु वक-युवती, जोडप्यांसाठी  विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटनी खास सोय  केली होती. यामुळे सर्वच रेस्टॉरंट नववधूसारखी सजली होती. शहरात पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच होती. या प्रमाणे,मुंबई-आग्रा महामार्गावरील अनेक बिअरबार, ढाब्मांवर तरुणाईची गर्दी झाली होती. त्यामुळे  हॉटेल्स व बिअरबारच्या  परिसरामध्मे साध्या  वेशात पोलीस बंदोबस्तांसाठी तैनात करण्यात  आलेले होते. शहरात सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी अधिकारी बंदोबस्तांसाठी तैनात होते.

पोलीस कर्मचार्‍मांसह पोलीस उपामुक्त, सहामक पोलीस आयुक्तांसह तेराही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तामध्मे सहभागी झाले होते. ग्रामीण पोलिसांकडून अनेक ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जात होते. पोलिसांच्या कडक बंदोबस्ताबाबत काहींनी नाराजीही व्यक्त केली.

न्यूझीलंडमध्ये सर्वप्रथम स्वागत
भारतासह न्यूझीलंड,ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये २०१९ वर्षाला निरोप देत २०२० या नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार वाजता न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे त्यानंतर ऑस्ट्रेलियातील सिडनी येथेही भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजता नववर्षाचे स्वागत करण्यात आले. दक्षिण गोलार्धात न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत सर्वात प्रथम होते.

पोलीस प्रशासनाची रात्रभर कारवाई
नववर्षाच्मा स्वागताच्या  पार्श्वभूमीवर झिंगाट तळीरामांवर कारवाईसाठी शहरात 2 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. नववर्षाच्मा स्वागताच्या पार्श्वभूमीवर पूर्व सह्न्ध्येला  शहरात वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचार्यान सह संबंधित पोलीस  ठाण्याच्या       कर्मचार्यांनी चोख नाकाबंदी करण्यात आली होती. मुंबई नाका, जेहान सर्कल, अंबड टी पॉईंट, कॅनडा कॉर्नर, मामको सर्कल, गंगापूर या सह सुमारे ४५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात  आली होती. नाकाबंदीवेळी पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची तपासणी केली जात होती. सायंकाळपासून सहा वाजेपासूनच पोलिसांंनी नाकाबंदी करायला प्रारंभ केला. सुरुवातीला वाहनचालकांकडे वाहन व चालक परवानेच तपासली जात होती. तर रात्री ८ वाजेनंतर मात्र पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझरच्मा माध्ममातून चालकांची मद्याची तपासणी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या