Sunday, September 27, 2026
HomeनाशिकNashik News : दिंडोरीतील जाधव वस्तीवर बिबट्या जेरबंद

Nashik News : दिंडोरीतील जाधव वस्तीवर बिबट्या जेरबंद

दिंडोरी | Dindori

येथे जाधव वस्तीवर शनिवार (दि.३१) रोजी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard) बालक ठार झाले होते. त्यामुळे याठिकाणी वनविभागाने (Forest Department) पिंजरा लावला होता. त्याचप्रमाणे बिबट्याच्या शोधासाठी पथके पाठवली होती. यानंतर काल रात्री ज्या ठिकाणी रुद्र अमोल जाधव यांचे शव मिळून आले होते, त्या ठिकाणी पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे.

- Advertisement -

पिंजऱ्यात (Cage) अडकलेली ही मादी असून, तिचे वय तीन वर्षे आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रुद्रचा बळी घेणारे हेच मादी आहे की दुसरा बिबट्या आहे, याबाबत खात्री होऊ शकलेली नाही. वनविभागाने पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना नाशिक (Nashik) येथे पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी अशोक काळे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. तसेच बिबट्यांचा अजूनही उच्छाद सुरू असून, काल रात्री शाम विष्णू जाधव यांच्या घराकडे दोन बिबटे महिलांना दिसून आले. यानंतर वनविभागाने तातडीने केंद्रांची व्यवस्था करावी अशी मागणी दिंडोरीचे (Dindori) सामाजिक कार्यकर्ते रमेश बोरस्ते यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

विराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत; म्हणाला, “2027 चा विश्वचषक हा…”

0
मुंबई । Mumbai भारतीय क्रिकेट संघाला कठीण प्रसंगातून अनेकदा विजयपथावर नेणारा आणि मैदानात आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli)...