Friday, April 3, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : मोरे मळा परिसरात बिबट्या जेरबंद

Nashik Leopard News : मोरे मळा परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिक | Nashik

रामवाडी मोरे मळा (More Mala) काकड बाग परिसरात बिबट्याच्या (Leopard) वावराचा प्रत्यय आला होता. रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपलेल्या आई व तिच्या लहान मुलीसोबत असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवून त्याला ओढून नेल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

- Advertisement -

यानंतर आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास वनविभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.हनुमानवाडी परिसरातील शिंदे मळा मखमलाबाद रोड येथील आप्पासाहेब शिंदे यांच्या शेतात तीन ते चार वर्ष वय असलेल्या बिबट (मादी) जेरबंद झाला आहे.

दरम्यान, या बिबट्याचा परिसरात वावर दिसल्यानंतर शीतल माळे यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अंकुश प्रकाश काकड यांना दिली होती. यानंतर काकड यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा (Cage) लावला होता.

ताज्या बातम्या

“बारामतीत आपले मोठे मन दाखवावे, सुनेत्रा पवार…”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे काँग्रेसला...

0
मुंबई । Mumbai राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी अखेर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक...