Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : पिंपळगाव केतकी शिवारात बिबट्या जेरबंद

Nashik Leopard News : पिंपळगाव केतकी शिवारात बिबट्या जेरबंद

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील पिंपळगाव केतकी (Pimpalgaon Ketki) शिवारात बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात दिंडोरीच्या वनविभागाला (Dindori Forest Department) यश आले आहे. गेल्या आठ दिवसात दोन बिबटे जेरबंद झाले आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) बिबट्यांनी दहशत निर्माण केली आहे. अनेक गावांमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळगाव केतकी शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. याबाबत पिंपळगाव केतकीचे उपसरपंच अनिल देशमुख व शितल फर्निचरचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांनी वनविभागाकडे या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी केली होती.

YouTube video player

यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील व वनपाल अशोक काळे यांनी कुठलाही अनुचित घटना होऊ नये म्हणून येथील तत्काळ पिंजरा उपलब्ध करुन शितल फर्निचरचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजर्‍यात दि.९ रोजी अडीच ते तीन वर्षीय मादी जातीचा बिबट्या अडकला. बिबट्या पकडला गेल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि: श्‍वास टाकला आहे.

तसेच अजूनही या परिसरात दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता होती. त्यामुळे पुन्हा तेथे पिंजरा (Cage) लावण्यात आला होता. यानंतर काल (बुधवारी) पहाटे पुन्हा एक दीड ते दोन वर्षाचा मादी बिबट्या या पिंजर्‍यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून ही मोहीम यशस्वी पार पाडली. यावेळी वनरक्षक योगेश दळवी, वनसेवक शांताराम शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

पिंपळगाव केतकी शिवारात अजूनही बिबट्या असल्याने शेतकर्‍यांनी आपले जनावरे गोठ्यात बांधावी. तसेच बाहेर लाईट लावावी, लहान बालकांना एकटे बाहेर पडू देवू नये, रात्रीच्या वेळी बाहेर पडतांना बॅटरीचा वापर करावा. त्याचबरोबर बिबट्या दिसल्यास त्वरीत वनविभागाशी संपर्क करावा. तर वनविभागाने अजून या परिसरात दोन ते तीन पिंजरे लावावे.

अनिल देशमुख, माजी सभापती, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...